महात्मा फुले यांना अभिवादन -१३४ वा स्मृतीदिन साजरा

 महात्मा फुले यांना अभिवादन -१३४ वा स्मृतीदिन साजरा



        अकोले -  अकोले शहरात सावित्रीबाई फुले वाचनालय अकोले व अकोले तालुका ग्राहक पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील शनी मंदिर परिसरात महात्मा ज्योतिराव फुले पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

        खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष माधवराव तिटमे म्हणाले, महात्मा फुले यांनी शैक्षणिक , सामाजिक वंचितांसाठी मोठे योगदान दिले आहे. महात्मा फुले यांनी त्या काळात मुंबई, पुणे आदि शहरात मोठमोठ्या इमारतीचे केलेले बांधकाम चांगल्या स्थितीत आजही दिमाखदार उभे आहेत. महात्मा फुले यांनी ठरविले असते तर अक्षरशः खोऱ्याने पैसा कमावला असता. फसवेगिरी, लबाड्या न करता खाबुगिरीची वाट न स्विकारताही ते शिक्षण महर्षी असूनही शिक्षण सम्राट न होता तीळ तीळ झिजले.

        आजघडीला काय परिस्थिती आहे शिक्षण व्यवस्थेची आपण  पाहत आहोत. शिक्षणाचा धंदा, महागडे शिक्षण, सर्व सामान्यांना न परवडणारे झाले आहे. सर्व सामान्यांनी आजही महात्मा फुलेंच्या 'गुलामगिरी ', 'शेतकऱ्यांचा आसूड ', 'सत्सार', ग्रंथ पुस्तके वाचावे असे अनेक विचार मांडले.

        यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस सिताराम भांगरे, कारभारी बंदावणे, रामहारी तिकांडे, रामदास पांडे, प्रमोद मंडलिक, अनेकांनी आपले विचार मांडले. या वेळी ग्राहक पंचायतचे मच्छिंद्र मंडलिक, दत्ता शेनकर, राम रुद्रे, चंद्रकांत घायवट, वाल्मीक नवले, मच्छिंद्र चौधरी, प्रकाश कोरडे, सुरेश गायकवाड, वेताळ, भाऊसाहेब गोरडे, भाऊसाहेब वाकचौरे, दत्ता शेटे, बाळासाहेब अस्वले, संतु शेटे, सुदाम मंडलिक आदी उपस्थित होते. प्रथम प्रतिमेचे पुजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारभारी बंदावणे यांनी भुषविले, सुत्र संचालन राम रूद्रे यांनी केले, आभार भाऊसाहेब गोर्डे यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post