मारुतीराव कोते अभिनव पब्लिक स्कूलमध्ये संविधान दिन वेगवेगळ्या उपक्रमांनी उत्साहात साजरा


अकोले : अभिनव शिक्षण संस्था संचलित मारुतीराव कोते अभिनव पब्लिक स्कूलमध्ये संविधान दिन मोठ्या उत्साहात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. विविध धर्म, संप्रदाय, भाषा, चालिरीती असतानाही, सर्वांमध्ये एकात्मता उत्पन्न करणारे असे  हे आपल्या देशाचे संविधान आहे. या संविधानाने आपल्या देशात अद्वितीयरितीने लोकशाही शासन दृढमूल केले आहे, म्हणून त्याचे आपल्या जीवनात फार मोलाचे महत्व आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उत्तुंग प्रतिभेची ती साक्ष आहे, असे प्रतिपादन शाळेच्या प्राचार्या अल्फोंसा डी. यांनी केले.  

ज्येष्ठ शिक्षिका माया सोनवणे यांनी संविधानाची निर्मिती, त्याचे कार्य तसेच उद्देश यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून सुरु झालेल्या या समारंभात सुरवातीला सर्वानी संविधानाची उद्देशिका सामुदायिकपणे म्हटली. राम आहेर यांनी देशभक्तिपर गीत गायले.यावेळी आराध्या सचिन भोर. झिनत अख्तर शेख, आरोही श्रीराम आहेर, ईश्वरी अण्णासाहेब गाडे, साक्षी नारायण डावरे, दर्शन विजय चौधरी, उत्कर्ष सचिन भोर या विद्यार्थ्यांची भाषणे झाली.  

संविधान दिनानिमित्त शाळेमध्ये चित्रकला भाषण निबंध व रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर लता सावंत व नूतन पवार यांनी भारतीय संविधानाच्या मुळ प्रतींची माहिती असलेला लेख वाचून दाखवला. मीना घुले यांनी आपले हक्क, अधिकार व आपली कर्तव्ये यावर विवेचन केले. कार्यक्रमाला, प्राचार्या अल्फोंसा डी., पर्यवेक्षक पराग सानप, पर्यवेक्षिका आरती जाधव, शिक्षिका सोनाली भोर, राजश्री आरोटे, माया सोनवणे,  मीना घुले, उषा वाकचौरे, मनीषा कानवडे, रूपाली चौधरी व रश्मी लहामगे यांची उपस्थिती होती. 

कार्यक्रमाची सांगता अभिनवच्या प्रांगणात संविधान रॅलीने संविधानाचा जयघोष करत करण्यात आली. संविधान दिनानिमित्त शाळेमध्ये माया सोनवणे यांचे व्याख्यान ठेवण्यात आले होते. तसेच चित्रकला, भाषण, निबंध व रांगोळी स्पर्धांचे नियोजन करण्यात आले होते. 

 स्पर्धेतील विजेते पुढील प्रमाणे

 भाषण स्पर्धा :  दर्शन विजय चौधरी - प्रथम, 

                        उत्कर्ष सचिन भोर द्वितीय, 

                        ईश्वरी अण्णासाहेब गाडे - तृतीय.


 निबंध स्पर्धा 

                     इयत्ता सातवी 

                            वरद नारायण डोंगरे - प्रथम, 

                            श्रेया रमेश व्यवहारे - द्वितीय, 

                           संकष्टी मोहन भोर - तृतीय. 


                    इयत्ता आठवी 

                            वैभवी सचिन देशमुख - प्रथम, 

                           साक्षी संतोष देशमुख - द्वितीय, 

                           सार्थक सुरेश नवले - तृतीय, 

 चित्रकला स्पर्धा

                   इयत्ता आठवी  

                           साक्षी देशमुख संतोष - प्रथम, 

                           प्रदीप जगन झोपाळे - द्वितीय, 

                           गायत्री बाळासाहेब लहाने - तृतीय


                 इयत्ता नववी 

                           श्रावणी किरण उकिरडे - प्रथम, 

                           वैष्णवी विलास वराडे - द्वितीय, 

                           शांभवी माधुरी ताजणे - तृतीय.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभवी सचिन देशमुख  तर आभार पायल दत्तात्रय कोटकर हिने मानले.संविधान दिनाचा कार्यक्रम उत्तमरीत्या पार पाडण्यासाठी रवळू बेळगावकर, रोहिणी दिघे, संतोष घोडेकर व हेमंत मंडलिक सर यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post