राजूरचे भव्य डांगी जनावरांचे प्रदर्शन 21 ते 24 डिसे. भरणार

 राजूरचे भव्य डांगी  जनावरांचे  प्रदर्शन 21 ते 24 डिसे. भरणार                            



 अकोले प्रतिनिधी/

 दर वर्षी डिसेंबर चे शेवटचे आठवड्यात येणारे  देशी – विदेशी जनावरांचे व कृषी मालाचे प्रदर्शन 21ते 24 डिसेंबर  भरणार आहे .स्वर्गीय माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचे दुःखद निधन झाल्यामुळे व  दशक्रिया विधी प्रदर्शनच्या दिवशी (दि.१५ डिसेंबर)येत असल्यामुळे कायदां व सुव्यवस्था प्रश्न उपस्थित होऊ नये. या साठी एक  आठवडा पुढे भरविण्यात येणार असल्याची माहिती सरपंच सौ पुष्पाताई निगळे , उपसरपंच संतोष बनसोडे आणि ग्रामविकास अधिकारी राजेंद्र वर्पे यांनी दिली . 

   राजूर येथे दरवर्षी डिसेंबर महिन्यात राजूर ग्रामपंचायत , पंचायत समिती , आदिवासी विकास विभाग आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने डांगी आणि देशी – विदेशी जनावरांचे व कृषी लाचे प्रदर्शन भरत असते . या प्रदर्शनासाठी अकोले तालुक्याबरोबर इगतपुरी , संगमनेर , जुन्नर , सिन्नर आदी तालुक्यांतून हजारो जनावरे खरेदी विक्री तर काही जनावरे प्रदर्शनासाठी शेतकरी आणत असतात . नगर , नाशिक , मालेगाव , सटाणा , औरंगाबाद आदी ठिकाणाहून जनावरांच्या खरेदी विक्रीसाठी व्यापारी येथे दाखल होत असतात . सलग चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात हजारो नागरिक आपली उपस्थिती लावत असतात . विविध व्यावसायिक आपली दुकाने यात मांडत असतात .या सर्व माध्यमातून या प्रदर्शनात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते .

Post a Comment

Previous Post Next Post