वैभवभाऊ माझे मित्र असून त्यांना माझी नेहमी साथ राहील- खा.सुजय विखे

वैभवभाऊ माझे मित्र असून त्यांना माझी नेहमी साथ राहील- खा.सुजय विखे
 अकोले प्रतिनिधी-
अकोले तालुकाच नव्हे तर राज्यातील दिन दलित, आदिवासी, बहुजन समाजाला न्याय देऊन त्यांचे उत्थान करण्याचे काम स्वर्गीय माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी करून राज्याला दिशा देण्याचे काम केलेले आहेत. विखे कुटुंबियांचे तिसऱ्या पिढीसोबत त्यांचे कौटुंबिक संबंध हे काल होते आज आहे उद्याही राहतील मी त्यांच्या स्मृतीला अभिवादन करून आमचे मित्र वैभव पिचड व कुटुंबियांना या दुःखातून सावरण्यासाठी परमेश्वराने त्यांना शक्ती देवो असे माजी खासदार सुजयदादा विखे यांनी आज राजूर येथे बोलतांना सांगितले.


माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचे नाशिक येथील रुग्णालयात उपचार घेत असताना दुःखद निधन झाले ,अंत्यविधीसाठी मुख्यमंत्री फडणवीस, माजीपालक मंत्री राधाकृष्ण विखे, दिलीप वळसे पाटील,बाळासाहेब थोरात,राज्यातील आमदार ,आदिवासी नेते यांनी पिचड कुटुंबियांना भेट दिली ,तर आज सुजय विखे,आमदार अमोल खताळ, दिलीप शिंदे,आमदार हिरामण खोसकर ,माजी आमदार शिवराम झोले,अकोले तालुका शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष जे .डी.आंबरे, माजी खजिनदार एस.पी.देशमुख, दै.नवराष्ट्र संपादक सुहास देशपांडे, अविनाश कराळे,गणेश उनवणे, सचिन चौधरी, रोटरी क्लब अकोले सेन्ट्रल चे अध्यक्ष विद्याचंद्र सातपुते, भाऊसाहेब वाकचौरे,डॉ.सर्जेराव फटांगरे ,विखे पा .यांचे समर्थक श्री.आरोटे,माजी नगरसेवक सचिन शेटे, शिवाजी वंडेकर, अमोल आरोटे,प्रा.डॉ.दातीर, प्रा.डॉ.विजय भगत, अकोले महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचारी आदींनी भेट दिली.


सुजय विखे यांनी श्रीमती हेमलताताई पिचड यांची भेट घेतली त्यावेळी भावनिक होत ताईंच्या डोळ्यांत अश्रू दाटताच विखे ही भावनिक होत ,तुम्ही काळजी करू नका, वैभव भाऊ हे माझे मित्र असून त्यांना माझी नेहमी साथ राहील असा विश्वास दिला .

Post a Comment

Previous Post Next Post