आ.सत्यजित तांबे यांच्या निधीतून संगणक व इ- पोडीयम भेट



आ.सत्यजित तांबे यांच्या निधीतून  संगणक व इ- पोडीयम भेट 


विधानपरिषदेच्या नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित दादा तांबे यांचे आमदार निधीतून अकोले तालुक्यातील 9 जिल्हा परिषद शाळांना संगणक संच व 10 हायस्कूल ना ई पोडीयम चे वितरण करण्यात आले. 

  अकोले तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शिवाजीराव नेहे यांचे पुढाकारातून हा कार्यक्रम संपन्न झाला. या प्रसंगी श्री पोपटराव नाईकवाडी, श्री बाळासाहेब शेटे सर, अरिफभाई तांबोळी, श्री रघुनाथ दादा शेणकर, अकोले शहर काँग्रेस अध्यक्ष रामदास धुमाळ, श्री रमेशराव बोडके, श्री अनिल वैद्य, श्री भाऊसाहेब थोरात, शाहीदभाई फारुकी, श्री एकनाथ सहाणे, श्री तुषार गायकर सर, श्री बाळासाहेब काडेंकर सर, संपतराव कानवडे, निखिल जोर्वेकर सर, डाॅ गोर्डे, गणेश पापळ यांचेसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. 

 श्री शिवाजी नेहे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करून या उपक्रमा मागील भुमीका स्पष्ट केली. जिल्हा परिषद शाळा वारंघुशी, पांगरी, तांभोळ, देवठाण, धामणगाव आवारी, धुमाळवाडी, पाचनई, लहीत खु, शासकीय आश्रमशाळा पैठण या शाळेना संगणक संच व अगस्ती विद्यालय अकोले, कळसेश्वर विद्यालय कळस, छत्रपती विद्यालय मेहंदुरी, सर्वोदय विद्यालय राजुर, राजा हरिश्चंद्र विद्यालय शेणीत, सह्याद्री विद्यालय ब्राम्हणवाडा, स्वामी विवेकानंद विद्यालय विरगाव, रामदास हायस्कूल बेलापूर, शासकीय आश्रमशाळा पैठण या शाळेंना ई पोडीयम चे वितरण करण्यात आले. 

 ग्रामस्थांचे वतीने व शाळेच्या ही वतीने श्री किरण बांडे सर, धामणगाव आवारीचे सरपंच श्री गणेश पापळ व धुमाळवाडीच्या सौ प्रणाली धुमाळ यांनी आमदार सत्यजित दादा तांबे यांचे आभार व्यक्त केले

Post a Comment

Previous Post Next Post