मालुंजकरवाडी( भोरकडा) येथील ग्रामस्थांचा पाणी सोडण्यास नकार
कॅनॉल वरील पुलाचे काम तातडीने करण्याची मागणी
अकोले प्रतिनिधी-
मालुंजकरवाडी (भोरकडा) येथील कॅनॉलच्या वर सिमेंट पाईप च्या माध्यमातून केलेले पुलाचे काम हे धोकादायक असून जोपर्यंत या पुलाचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत कॅनॉलला पाणी जाऊ देणार नाही. असा इशारा ग्रामस्थानी दिला आहे.यावेळो ग्रामस्थ आक्रमक झालेले दिसून आले आहेत. मालुंजकरवाडी ( भोरकडा) येथे जाण्यायेण्यासाठी अत्यंत धोकादायक तात्पुरत्या स्वरूपाचा पाईप टाकून पर्याय केलेला आहे. त्यावरून शालेय मुले,भाजीपाला वाहतूक करणारे ट्रक,शेतमजूर हे जा करत आहेत. आपला जीव मुठीत धरून या ठिकाणावरून
प्रवास करावा लागतो. निवडणुकीच्या काळात आ. डॉक्टर किरण लहामटे यांच्या जवळचा एक कार्यकर्ता पुलावरून प्रवास करताना थोडक्यात बचावला आहे. यापूर्वी ही या बाबत प्रशासनाला माहिती देण्यात आली होती,याच्या संदर्भात बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या.तरीही प्रशासनाने या कडे दुर्लक्ष केले आहे.या तात्पुरत्या स्वरूपातील पुलावरून ये जा करताना काही दुर्दैवी घटना घडल्यास त्याला कोण जबाबदार राहील.येथील पुलाचे काम तातडीने न झाल्यास येथील महिला ग्रामस्थ व शालेय विद्यार्थी यांनी तीव्र स्वरूपात आंदोलन करून हा कॅनॉल बुजवण्याचे काम करण्याचा इशारा दिला आहे.