श्रमदानातून बांधला वनराई बंधारा

 श्रमदानातून बांधला वनराई बंधारा  



अकोले प्रतिनिधी-मौजे शिरपुंजे येथे कृषी  विभागाच्या वतीने श्रमदानातून बांधला वनराई बंधारा  तालुका कृषी अधिकारी सचिन गिरी, मंडळ कृषी अधिकारी यशवंत खोकले यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपुंजे येथे वनराई बंधारा श्रमदानातून शेतकरी आणि कृषी कर्मचारी यांनी श्रमदान करून वनराई बंधारा बांधला  आदिवासी भागात पावसाळ्यात प्रचंड पाऊस पडतो  आणि तो वाहून जातो परंतु ओढे नाले यांना जे आत्ता कमी प्रमाणात जे पाणी वाहते  ते पाणी जर छोटे छोटे वनराई बंधारे बांधून  अडविले तर वनराई बंधाऱ्यातील साठलेल्या पाण्यामुळे आजू बाजूला असलेल्या शेतातील गहू हरभरा पिकांना संवरक्षित पाणी देण्यास मदत होईल,

 तसेच शेतकरी यांच्या जनावरांना काही कालावधी साठी पिण्याच्या पाण्याची सोय होईल.असे येथील शेतकरी मोहन धिंदळे,बाळू धिंदळे,यांनी सांगितले हा वनराई बंधारा बांधण्यासाठी कृषी सहाय्यक सचिन साबळे, शरद लोहकरे, संतोष साबळे, विनायक तळपाडे  रुपेश सुपे, संजीवनी धिंदळे या कृषी सहाय्यक यांनी  शेतकरी यांच्या सोबत श्रमदान करून वनराई बंधारा बांधला


Post a Comment

Previous Post Next Post