प्रजासत्ताक दिनी प्रवरा विद्यालयात सायकल वाटप
इंदोरी येथील प्रवरा विद्यालयात भारताचा ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्याच्या उत्साहाने व देशभक्तीच्या चैतन्याने ध्वजस्तंभाचे पूजन व ध्वजारोहण विद्यालयाचे मुख्याध्यापक एस बी मालुंजकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्र. समाजाचे माजी सचिव व प्रश्रमप्रतिष्ठान अहिल्यानगर चे अध्यक्ष जे डी खानदेशे यांनी श्रमप्रतिष्ठान योजने अंतर्गत गरीब व होतकरू प्रवरा विद्यालयातील १० विद्यार्थ्यांना सायकल चे वाटप केले .
कार्यक्रमाप्रसंगी स्काऊट गाईड च्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट पथसंचलनाचे प्रदर्शन करून प्रमुख अतिथींना मानवंदना देऊन प्रेक्षकांची मने जिंकली.कार्यक्रमाच्या प्रास्तविकात विद्यालयाचे मुख्याध्यापक एस बी मालुंजकर यांनी श्रमप्रतिष्ठान चे कार्य सांगितले व मोबाईलच्या वापरा बाबत
विद्यार्थ्यांच्या हाती असलेला मोबाईल हा शिकण्यासाठी आधार मिळावा म्हणून पालकांनी उपलब्ध करून दिला आहे; मात्र खरंच मोबाईलमुळे शिक्षण होते आहे का, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. फोनच्या वापराचे नकारात्मक परिणाम सध्या विविध संशोधनातून आणि अहवालांतून समोर येताहेत. ते टाळण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करण्याची वेळ आली आहे. जगातील सरासरी चारपैकी एका शाळेने मोबाईल फोनवर बंदी घातल्याने त्याचा नकारात्मक परिणाम कमी झाल्याचे समोर आले आहे ,म्हणून पालकांनी मोबाईल बाबत सजग असायला हवे असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी पत्रकार हेमंत आवारी यांनी वाचनाचे महत्व सांगताना वाचनाने माणूस ज्ञानी होतो आणि त्याला पुस्तकाच्या रूपाने एक नवीन मित्र मिळतो. वाचन ही एक कला आहे. वाचन माणसाला माणूस बनविते, जीवनाला एक नवी दिशा देते, विचार करायला शिकविते, अंतर्मुख करविते, त्याचप्रमाणे जीवनात योग्य- अयोग्य काय याची जाणीव करून देते असे प्रतिपादन केले.
विद्यार्थी देशभक्ती पर मनोगते तसेच प्रभात फेरी व साहित्य कवायत असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी यांचा मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तसेच मानाचा पुरस्कार प्रवरा पुत्र विद्यालयातील केतन सचिन मालुंजकर तर प्रवरा कन्या स्वरा रवींद्र देशमुख यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास इंदुरी गावच्या सरपंच मनीषा ठोंबाडे ,ॲडव्होकेटसुनील नवले, प्रगतशील शेतकरी चंद्रकांत नेहे, ताराचंद नवले, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रवींद्र देशमुख,माजी सरपंच सौ लता वाकचौरे, इंदुरी च्या ग्राम विस्तार अधिकारी संगीता देशमुख तसेच ग्रामस्थ संजय नवले, सुवास नवले ,विजय चौधरी ,उदय थोरात ,राजेंद्र नवले ,रवींद्र ढगे अविनाश मालुंजकर, तुळशीराम नवले उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शीतल बिबवे यांनी केले तर आभार शशिकांत चौधरी यांनी केलेकार्यक्रमास विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक एस व्ही बांगर, आर वाय कोंडार, बी एम भोजने, जे जी वाघ,अमोल देशमुख, प्रसाद देशमुख, शशिकांत चौधरी,संदीप भरीतकर, शिक्षिका शितल बिबवे, लक्ष्मी मुंढे, तसेच अरुण बोंबले,राजू बेनके, एस बी गावडे उपस्थित होते.
