सौ. लीलावती तथा मंदाबाई श्रीनिवास येलमामे यांचे निधन

 



सौ. लीलावती तथा मंदाबाई श्रीनिवास येलमामे यांचे निधन 

अकोले - राजूर येथील रहीवासी सौ. लीलावती तथा मंदाबाई श्रीनिवास येलमामे (७२) यांचे अल्पशा आजारात उपचारादरम्यान राजूर येथील निवासस्थानी रविवारी (१२ जानेवारी) पहाटे ३.३० वाजता निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर रविवारी दुपारी १२.१० वाजता राजूर येथील स्मशानभूमीत मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत विधिवत अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, विवेक व समीर ही दोन मुले, सुना, भाऊ सुनिल, भावजय, पुतण्या, जावई, नातवंड असा मोठा परिवार आहे. राजूर येथील सत्यनिकेतन संस्थचे संचालक, जेष्ठ पत्रकार व सर्वोदय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे निवृत्त प्राचार्य श्रीनिवास तबाजी येलमामे यांच्या त्या  पत्नी होत.

Post a Comment

Previous Post Next Post