डॉ. विश्वास आनंदराव आरोटे यांना "पत्रकार भूषण पुरस्कार" माजी केंद्रीय मंत्री तथा राज्यपाल राम नाईक यांच्या हस्ते २०२५' प्रदान!
अकोले ( प्रतिनिधी )
मराठी वृत्तपत्र लेखक संघ, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने देण्यात येणारा 'पत्रकार भूषण पुरस्कार २०२५' हा डॉ. विश्वास आनंदराव आरोटे यांना प्रदान करण्यात आला. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, डॉ. सुरेंद्र गावसकर सभागृह, दादर येथे उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यपाल तथा माजी केंद्रीय मंत्री राम नाईक हे होते तर ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, सुकृत खांडेकर, भाऊ तोरसेकर, तुलसीदास भोईटे आणि संस्थापक अध्यक्ष एकनाथ बिडकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
डॉ. विश्वासराव आरोटे यांच्या पत्रकारितेतील प्रदीर्घ व आदर्श कार्याचा सन्मान म्हणून हा पुरस्कार देण्यात आला. सन्मानचिन्ह, शाल आणि पुष्पगुच्छ प्रदान करून त्यांना गौरविण्यात आले. या पुरस्कार सोहळ्यात मान्यवरांनी विश्वास अरोटे यांच्या योगदानाचे कौतुक केले. त्यांनी समाजातील विविध क्षेत्रांत दिलेल्या सकारात्मक योगदानाचा उल्लेख करत त्यांना प्रेरणास्थान म्हणून संबोधले. यावेळी दैनिक समर्थ गांवकरी मुंबई संपादक दशरथ चव्हाण. मंत्रालय प्रतिनिधि विष्णू बुरे. संतोष झोडगे.विजय गडाशी, पत्रकार अशोकराव शेळके. हे उपस्थित होते, तर प्रमुख पाहुण्यांमध्ये पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर व्यक्तिमत्त्वे उपस्थित होती.
पुरस्कार स्वीकारताना डॉ. आरोटे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, "हा पुरस्कार माझ्यासाठी केवळ सन्मान नाही, तर अधिक जोमाने काम करण्यासाठीची प्रेरणा आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून समाजासाठी सतत कार्यरत राहण्याचा संकल्प या सन्मानामुळे दृढ झाला आहे." कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित मान्यवरांनी डॉ. आरोटे यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांच्या प्रामाणिक आणि समाजाभिमुख पत्रकारितेला सलाम केला. अनेकांनी त्यांच्या कार्यातून समाजाला प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचा समारोप उत्कृष्ट नियोजन आणि उत्साही वातावरणात झाला. उपस्थित सर्वांनी डॉ. विश्वास आरोटे यांचे अभिनंदन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्याची कामना केली.
कार्यक्रमाची वैशिष्ट्ये:२४ वा वर्धापन दिन व पुरस्कार वितरण सोहळा.
पत्रकार भूषण पुरस्कारासह इतर मान्यवर व्यक्तींना देखील विविध क्षेत्रातील योगदानासाठी सन्मानित करण्यात आले.उपस्थित मान्यवरांची प्रेरणादायी भाषणे. हा सोहळा पत्रकारिता क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरला असून, डॉ. आरोटे यांना मिळालेला हा सन्मान त्यांच्या कार्याची दखल घेणारा ठरला आहे.
