अगस्ती महाविद्यालयाच्या केंद्रावर बारावी बोर्ड परीक्षेसाठी 1420 विद्यार्थी प्रविष्ट
अकोले प्रतिनिधी- बारावीच्या परीक्षा केंद्र क्र . 0271 मध्ये अकोल्यातील अगस्ती कला ,वाणिज्य व दादासाहेब रूपवते विज्ञान महाविद्यालयासह इतर शैक्षणिक संस्थेतील 1420 विद्यार्थी प्रविष्ट झाले असून मंगळवार दि. 11/02/25 रोजी इंग्रजी विषयाचा पेपर असून विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था अगस्ती महाविद्यालय मुख्य इमारत, विज्ञान भवन, वाणिज्य भवन ,MBA/MCA इमारत व पॉलिटेक्निक कॉलेज येथे करण्यात आलेली आहे अशी माहिती अगस्ती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भास्कर शेळके व केंद्र संचालक प्रा. चांगदेव डोंगरे यांनी दिली
.उर्वरित सर्व पेपर साठीची बैठक व्यवस्था अगस्ती महाविद्यालयाच्या मुख्य इमारत, विज्ञान भवन व वाणिज्य भवन याच ठिकाणी करण्यात आलेली आहे . विद्यार्थ्यांना सकाळ सत्रामध्ये 10.30 वाजता व दुपारच्या सत्रामध्ये 2.30 वाजता परीक्षा हॉलमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. परीक्षेसाठी उपकेंद्रसंचालक म्हणून प्रा. विवेक वाकचौरे, प्रा. सुनील टिक्कल , प्रा. बाळासाहेब गोर्डे व प्रा. राजेंद्र कर्पे काम पाहाणार आहेत.
या विद्यार्थ्यांची परीक्षा शांततेत व सुरळीत पार पाडावी.व निर्भयपणे,तणावमुक्त,भयमुक्त वातावरणातपरीक्षा द्यावी ,असे आवाहन संस्थेचे कायम विश्वस्त माजी आमदार वैभवराव पिचड, गिरजाजी जाधव, अध्यक्ष सुनील दातीर, सचिव सुधाकर देशमुख, खजिनदार धनंजय संत यांनी केले. सर्व विद्यार्थ्यांना महाविद्यालया तर्फे हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
