तेजश्री ताजणेची फूड अँड ड्रग्ज अँडमिनिस्ट्रेशन सर्व्हिसेस - वर्ग 2 अधिकारी पदी निवड .
अकोले (प्रतिनीधी)-
अकोले शहरानजिक असलेल्या शेकईवाडी येथील कु . तेजश्री बादशहा ताजणे हिची महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत ( एम् . पी . एस् . सी . ) अन्न आणि औषध प्रशासन विभागांतर्गत फूड अँड ड्रग्ज अँडमिनिस्ट्रेशन सर्व्हिसेस - वर्ग 2 अधिकारी पदी नुकतीच निवड झाली आहे .
तेजश्री ही शेकईवाडी , अकोले येथील रहिवासी असलेले तसेच राजूर येथील सत्यनिकेतन संचलित सर्वोदय विद्यामंदिर , ज्युनिअर कॉलेज चे प्राचार्य बादशहा नारायण ताजणे यांची कन्या, अकोले ग्रामपंचायतीचे माजी सरपंच स्वर्गीय नारायणराव ताजने यांची नात व अगस्ति कारखान्याचे माजी संचालक भिमसेन उर्फ बाळासाहेब ताजने, उद्योजक सुभाष ताजने यांची पुतणी आहे. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
