22 व्या वर्षी यश पानसरे सी ए परीक्षा उत्तीर्ण-
अकोले प्रतिनिधी-
कै. दिलीप रायभान पानसरे यांचे लहाने चिरंजीव व राजेंद्र रायभान पानसरे यांचे पुतणे चि. यश याने वयाच्या २२ व्या वर्षी सीए सारख्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले आहे.
यश चे वडील साखर कारखान्यामध्ये इंजिनियर ,एम डी असल्यामुळे वेळोवेळी शाळा बदलाव्या लागल्याने प्राथमिक शिक्षण प्राथमिक शाळा अशोकनगर श्रीरामपूर, उदगीर श्रीगोंदा,पुणे महानगर पालिका पिंपरी चिंचवड या मराठी शाळेमध्ये शिक्षण घेतले आहे. यश पहिली पासूनच हुशार असून त्यास 10 वी ला 94 % मार्क असूनही इंजिनियर, डॉक्टर न होता त्याने कॉमर्स साईडची निवड करून सी ए होण्याचे ठरविले व त्यात त्याला पहिल्या प्रयत्नात प्राप्त झाले आहे . नुकताच घुलेवाडी येथे पानसरे वस्तीवर यशचा सत्कार सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमास शैक्षणिक, राजकीय, अनेक नातेवाईक उपस्थित राहून त्याचा सत्कार केला व त्याच्या यशाचे तोंडभरून कौतुक केले .
या प्रसंगी चंदनपुरी विद्यालयाचा माजी प्राचार्य शैलजा पानसरे, सुदाम पानसरे, प्रा.नीलीमा फटांगरे ,अक्षय आभाळे, प्रा.आशिष सहाणे, प्रा.अनुजा आभाळे-सहाणे, भाजपचे भाऊसाहेब आभाळे, अमोल आभाळे यांनी मनोगत व्यक्त केले.
यश CA परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात,अकोले तालुक्याचे आमदार किरण लाहमटे, माजी आमदार वैभवराव पिचड,पदवीधर मतदार संघाचे माजी आमदार डॉ.सुधीर तांबे, अकोले बाजार समितीचे माजी सचिव अरुण आभाळे,अगस्ती. कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक भागवतराव वैद्य,अकोले तालुका पत्रकर संघाचे अध्यक्ष अमोल वैदय, अकोले तालुका राष्ट्रवादी युवक अध्यक्ष अक्षय आभाळे यांनी यश चे यशाबद्दल त्याचा सत्कार करून त्याचे अभिनंदन करत त्यास भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहे.
