हा देश माझा आहे ही भावना निर्माण झाल्यास देश महान होईल- हभप दीपक महाराज देशमुख
रोटरी क्लब तर्फे अगस्ति विद्यालयास इ लर्निंग स्मार्ट टीव्ही भेट | अगस्ति विद्यालयात विद्यार्थ्यांचा रोटरी इन्ट्रॅक्ट क्लब चे उदघाटन
अकोले ( प्रतिनिधी ) -
ज्या देशातील नागरिकांमध्ये ' हा देश माझा आहे ' ही भावना निर्माण होईल त्यावेळी तो देश जगाच्या पातळीवर सर्वात महान देश म्हणून ओळखला जाईल असे प्रतिपादन रोटरी क्लब अकोले सेंट्रल चे पब्लिक इमेज डायरेक्टर तथा अगस्ति देवस्थान ट्रस्ट चे विश्वस्त हभप दीपक महाराज देशमुख यांनी केले.
१२० व्या जागतिक रोटरी दिना निमित्त सन २०२६-२७ चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर जयेश पटेल यांच्या पी.पी. पटेल मेटल पावडर कंपनी सोलापुर यांच्या सी.एस.आर. फंडातून , विद्यमान डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ .सुरेश साबू यांच्या मार्गदर्शनाखाली व रोटरी क्लब अकोले सेंट्रल च्या सहकार्याने अगस्ति विद्यालय अकोले येथे आयोजित कार्यक्रमात रोटरी क्लब अकोले सेंट्रल चे पब्लिक इमेज डायरेक्टर हभप दीपक महाराज देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली डिजिटल क्लासरूम साठी शैक्षणिक इ लर्निंग सॉफ्टवेअर्स सह 43 इंची स्मार्ट टीव्ही लोकार्पण सोहळा संपन्न झाला. त्या वेळी ते बोलत होते.
विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण वाढी साठी व त्यांच्यामध्ये सामाजिक जाणिव निर्माण व्हावी यादृष्टीने रोटरी इन्ट्रॅक्ट क्लब ऑफ अगस्ति विद्यालय अकोलेचा उदघाटन सोहळा या वेळी संपन्न झाला. कार्यक्रमास अगस्ति एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष सतीशराव नाईकवाडी, रोटरी क्लब अकोले सेंट्रल चे अध्यक्ष प्राचार्य विद्याचंद्र सातपुते, सेक्रेटरी अमोल देशमुख, उपाध्यक्ष दिनेश नाईकवाडी, खजिनदार संदीप मोरे, माजी अध्यक्ष अमोल वैद्य,सचिन देशमुख, सचिन शेटे,सचिन आवारी,डॉ.रवींद्र डावरे,सदस्य निलेश देशमुख, प्राचार्य संतोष कचरे, विजय पावसे,रोहिदास जाधव, आदीसह अगस्ति विद्यालयाचे उप मुख्याध्यापक भाऊसाहेब घेलवडे, पर्यवेक्षक मंगेश खांबेकर,एस .बी.शिंदे,व्यवस्थापन समिती सदस्य सचिन शिंदे, गिरीश नवले,सौ. फरताळे ताई, घनश्याम माने,संजय पवार हे मान्यवर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हभप दीपक महाराज देशमुख पुढे म्हणाले की, रोटरी क्लब चा आजचा उपक्रम कौतुकास्पद असून रोटरी ने जगातून पोलिओ निर्मूलन केले असून अनेक उपक्रमांच्या माध्यमातून आपला वेगळा ठसा उमटविला आहे.
इन्ट्रॅक्ट क्लब च्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना मदत होईल,राष्ट्र बांधणीचे पुरस्काराने अनेक गुणवंत शिक्षकांना त्यांच्या शैक्षणिक कार्याची पावती म्हणून गौरविण्यात येते,अंधमुक्त गाव अभियान अंतर्गत अकोले तालुक्यात अनेक गावांत शिबिरे घेण्यात आली आता पर्यंत 2300 नागरीकांनी याचा लाभ घेतला असून 150 च्या वर ऑपरेशन केली आहेत.या क्लब च्या सदस्यांनी आपल्या व्यवसायातून स्वतःची ओळख निर्माण केली असून आपले ज्ञान व संपत्ती सामाजिक कामासाठी कामी या हेतूने रोटरी च्या माध्यमातून कार्यरत आहे.इमारती मुळे देश मोठा म्हणून ओळखला जात नाही तर हा देश माझा आहे ही भावना नागरिकांमध्ये निर्माण झाल्यास तो देश मोठा म्हणून ओळखला जाईल असे मत व्यक्त केले.
यावेळी रोटरी क्लब चे अध्यक्ष यांनी रोटरी क्लब च्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सामाजिक, शैक्षणिक, आरोग्या विषयक ,पर्यावरण उपक्रमांची माहिती दिली. इन्ट्रॅक्ट क्लब मुळे विद्यार्थ्यांमधील नेतृत्व गुण वाढीस लागतील व त्यांच्या मध्ये सामाजिक जाणिव तयार होऊन ते समाजासाठी मोठे योगदान देतील असा विश्वास व्यक्त केला तर इतर विद्यालय हा क्लब स्थापन करण्यास इच्छुक असतील तर त्या विद्यालयातही इन्ट्रॅक्ट क्लब सुरू करण्यास सहकार्य केले जाईल .या माध्यमातून रोटरी क्लब चे वारसदार निर्माण होतील ,या माध्यमातून विद्यालयात अनेक उपक्रम राबविबण्यास रोटरी क्लब अकोले सेंट्रल योग्य ते सहकार्य करील असे मत व्यक्त केले.
यावेळी पर्यवेक्षक एस बी.शिंदे यांनी अगस्ति विद्यालयास इ लर्निंग टी व्ही दिल्या बद्दल व शालेय विद्यार्थ्यांच्या नेतृत्व गुण वाढीसाठी व सामाजिक जाणिव निर्माण होण्यासाठी रोटरी क्लब ने इन्ट्रॅक्ट क्लब स्थापन केल्याबद्दल आभार मानले व विद्यालयाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असे मत व्यक्त केले.
रोटरी क्लब च्या वतीने अकोले तालुक्यात प्रथम स्थापन झालेल्या रोटरी इन्ट्रॅक्ट क्लब ऑफ अगस्ति विद्यालय अकोलेचे अध्यक्ष कु पलक आवारी सेक्रेटरी कु श्रुती नाईकवाडी, खजिनदार कु स्वराली आभाळे व इतर सदस्य अशा 15 विद्यार्थ्यांचा गुलाबपुष्प व पेन देऊन सन्मान करण्यात आला.जागतिक रोटरी दिन केक कापून विद्यार्थ्या समवेत साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्तविक व सूत्रसंचालन घनश्याम माने यांनी केले. तर आभार रोटरी क्लब चे सेक्रेटरी अमोल देशमुख यांनी मानले. कार्यक्रम यशश्वीतेसाठी मुख्याध्यापक शिवाजीराव धुमाळ,पर्यवेक्षक मंगेश खांबेकर,एस.बी.शिंदे,उपमुख्याध्यापक भाऊसाहेब घेलवडे,घनश्याम माने, संजय पवार आदीसह रोटरी सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले.
