श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय, मेहेदुंरी आमदार सत्यजित दादा तांबे यांचे आमदार निधीतून ई पोडीयम चे वितरण
श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय, मेहेदुंरी तालुुका अकोले जिल्हा अहिल्यानगर या विद्यालयास नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित दादा तांबे यांचे आमदार निधीतून ई पोडीयम चे वितरण करण्यात आले.
सदर वितरण कार्यक्रम अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारीणी सदस्य व मेहेदुंरी शाळेचे व्यवस्थापन समिती अध्यक्ष रमेशराव जगताप यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या प्रसंगी अकोले तालुका काँग्रेस पक्ष अध्यक्ष शिवाजी नेहे, मुख्याध्यापक राजेंद्र सोनवणे व सर्व सहकारी शिक्षक,शिक्षीका व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी रमेशराव जगताप यांनी आ.सत्यजित तांबे यांचे कार्य दिशादर्शक व प्रेरणादायी आहे.असे मत व्यक्त करून संस्थेच्या व विद्यालयाच्या वतीने आ.तांबे यांचे आभार मानले.
