मला बी जत्रेला येऊ द्या की...
अकोले प्रतिनिधी-
जुन्या काळात म्हणजे ३०-३५ वर्षांपूर्वी जत्रा अन बैलगाडी समीकरण ठरलेलं असायचं .
ओघाने ती आता दुर्मिळ झाली आहे. पूर्वीच्या काळी पाचशे लोकवस्ती असलेल्या चारशे घरी ही बैलगाडी असायची. पण आता एका गावात एखादी बैलगाडी पाहायला मिळाली तरी खूप.
आज खूप दिवसांनी बैलगाडी व त्यातून जत्रेला जाणारे दिसले गाडी शेरणखेल वरून अगस्ती यात्रेसाठी सजवून निघाली होती. अशीच पूर्वी अगस्ति पूल नसताना प्रवरा नदी पात्रातून अगस्ति ऋषींचे दर्शन घेण्यासाठी बैलगाडीतून पैसे देऊन भाविक जात होते.त्याची आठवण या निमित्ताने आली आहे. खूप छान वाटले. लाकडी बैलगाडीतुन यात्रेला येताना पाहून नवीन पिढी कुतूहलाने पाहताना दिसत होती. काळाच्या ओघात लुप्त पावत असलेली बैलगाडीची मजा नवीन पिढीला त्या गाडीची ओळख रहाणे गरजेचे आहे असे जाणकारांनी मत व्यक्त केले.
संतोषभाऊ रणपिसे यांनी टिपलेला हा प्रसंग पाहून "मला बी जत्रेला येउद्या की..."असे म्हणावे वाटते.
