उसाचा ट्रॅक्टर पलटी झाल्याने एक ठार दोन जखमी
अकोले प्रतिनिधी-
धामणगाव आवारी गावातील चिंचखांड घाटात ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर पलटी होऊन एकजन मयत झाला दोघे जखमी झाले आहेत, रात्री १२ वाजण्याच्या सुमारास उस घेऊन अगस्ती कारखान्याकडे जात असतांना घाटात चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.
या अपघातात धुडकू कथा अहिरे, वय २० राहणार खरडे, तालुका - चाळीसगाव हा मयत झाला आहे, तर उखा रतन मोरे, राहणार - पिंपरखेड, चाळीसगाव सह अन्य एक जन गंभीर जखमी झाला आहे, जखमीवर भांडकोळी हाँस्पिटल येथे उपचार सुरु आहे, हा अपघात घडल्यानंतर स्थानिक मदतणीस म्हणून नामदेव कोंडिबा गावंडे हे पोहचले आणि मदत कार्य सुरु केले.
या घटनेची माहिती अगस्ती प्रशासनाला समजताच कारखान्याचे सतिष देशमुख, संजय राठोड, नथू राठोड, खंडू आवारी, संपत चौधरी, पप्पू नाईकवाडी तसेच अकोले पोलीस स्टेशनचे महेंद्र गुंजाळ, संदीप भोसले, रोहिदास पावसे, सोमनाथ पटेकर, गावातील स्थानिक ग्रामस्त तसेच अँम्बुलन्स चालक गणेश हासे, बिरबल वाकचौरे , दोन जेसीबी हे घटनास्थळी पोहचून मदत कार्य सुरु केले, पहाटे पर्यंत जखमींना बाहेर काढण्याचे कार्य सुरु होते, स्थानिक मदत म्हणून धावून आलेला नामदेव गावंडे याने देखिल महत्वाचे कामगिरी केली आहे
