उद्या शुक्रवारी वारंघुशी फाट्यावर शेतकऱ्यांचे रस्ता रोको आंदोलन
अकोले प्रतिनिधी- अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी शुक्रवारी दि.28 रोजी वारंघुशी फाटा येथे रस्ता रोको आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाची अधिकृत माहिती तहसीलदार, गट विकास अधिकारी, कृषी अधिकारी, आदिवासी विकास महामंडळ व पोलीस प्रशासनाला देण्यात आल्याची माहिती समाजसेवक अनंत घाणे यांनी दिली.
कर्जबाजारी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफी देण्यात यावी,शेतकऱ्यांना सर सकट पीक विम्याचा लाभ मिळावा,धान पिकास रु.3500 ते 5000 प्रति क्विंटल हमी भाव मिळावा,बाळ हिरड्याला हमीभाव मिळावा या साठी हे आंदोलकांच्या मागण्या आहेत.
या आंदोलनात अनंत घाणे,भरत घाणे,तुकाराम खाडे,जयराम ईदे, घारे महाराज,पांढरे पाटील,सागर रोंगटे, बाळासाहेब झडे,बाजीराव सगभोर,रामदास पिचड,कुंडलिक घारे,सुरेश गभाले, सुनील पवार,मारुती खाडे,विठ्ठल भवारी,तुकाराम सारुक्ते आदीसह शेतकरी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी होणार आहेत.
