अभिनव एम.बी.ए.चे विभाग प्रमुख प्रा. शोएब शेख 'युवा संशोधक' म्हणून सन्मानित





अभिनव एम.बी.ए.चे विभाग प्रमुख प्रा. शोएब शेख  'युवा संशोधक' म्हणून सन्मानित


नुकत्याच कर्नाटक येथील  'कलाज रिसर्च अँड स्किल ट्रेनिंग ऑर्गनायझेशन ' च्या विद्यमाने पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये अकोले येथील अभिनव शिक्षण संस्थेच्या एमबीए महाविद्यालयाचे विभाग प्रमुख प्रा. शोएब शेख यांना  यंग रिसर्च अवॉर्डने  सन्मानित करण्यात आले.

दुर्गम भागातील समजल्या जाणाऱ्या अभिनव एम बी ए कॉलेज येथे प्रा शेख हे विद्यार्थ्यांकरता देखिल विविध उपक्रमाद्वारे  व्यवस्थापनाचे तसेच संशोधनाचे महत्त्व अवगत करतात.

प्रा. शोएब शेख यांची संशोधन क्षेत्रातील  कामगिरी उल्लेखनीय स्वरूपाची राहिली आहे  त्याना बँकिंग & फायनान्स या विषयात मास्टर ऑफ फिलॉसोफी मिळालेली आहे, त्यांचे  १५ आंतराष्ट्रीय रिसर्च पेपर प्रकाशित असून, १० राष्ट्रीय रिसर्च पेपर देखील प्रकाशित आहे, ५ पेटंट त्याच्या नावावर असून, ४ टेक्स्ट बुक प्रकाशित झालेले आहेत. १० आंतराष्ट्रीय परिषदेत त्यानी सक्रिय सहभाग नोंदवला असून वेळोवेळी गौरव करण्यात आला आहे , तसेच ऑगस्ट २०२४ मध्ये भुवनेश्वर उडीसा झालेल्या आंतराष्ट्रीय परिषदेत त्यांना बेस्ट इंडिया रिसर्च इन्व्हेंटर अवॉर्ड  ने देखीलसन्मानित करण्यात आलेले आहे.

 त्यांच्या या यशाबद्दल  संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मधुकरराव नवले, उपाध्यक्ष डॉ जयश्री देशमुख, सहसचिव प्राचार्य अल्फोंसा डी., खजिनदार विक्रम नवले आणि सर्व विश्वस्त, सर्व विभागांचे  प्राचार्य, आय एम बी ए चे प्रा.   राहुल कानवडे प्रा. अमोल उगले यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

Previous Post Next Post