माता रमाईने निष्ठेने व कष्टाने संसाराचा गाडा चालविला- भाऊसाहेब वाकचौरे

 



अकोले ( प्रतिनिधी ) माता रमाई आंबेडकर यांनी निष्टेने व कष्टाने संसाराचा गाडा चालवला म्हणून बाबासाहेेबांचे कार्य उभे राहिले. रमाई च्या त्यागातून बाबासाहेब घडले असे गौरवोदगार भाजपा सोशल मीडिया सेल चे जिल्हा संयोजक भाऊसाहेब वाकचौरे पाटील यांनी काढले.

       अकोले कारवाडीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने अभिवादन सभा आयोजित करण्यात आली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी रिपाई चे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष सुरेश देठे होते. यावेळी कळस गावचे सरपंच राजेंद्र गवांदे, कवी अशोक शिंदे, बाळासाहेब वैराट आदी उपस्थित होते.

       माता रमाई ह्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी होत्या. वडिलांची गरिबी होती. या गरिबीच्या जाणीवेतून साथ दिली. बाबासाहेब परदेशात शिक्षणासाठी असताना शेण गोळा करून गोवऱ्या व सरपण विकून प्रपंच चालवला. ब्यारिष्टर ची बायको अशी कामे करती म्हणून पहाटे च काम करित असत. चार मुलांचे निधन झाले. मोठा मुलगा यशवंत हे आजारी असे परंतु पतीला याची माहिती कळू दिली कारण त्यांच्या शिक्षणावर परिणाम होऊ नये. जीवनात रमाई यांनी त्याग केला म्हणून त्या त्यागमूर्ती झाल्या. त्यांच्या त्यागातून देशाचा प्रपंच उभा राहिला. असेही भाऊसाहेब वाकचौरे यांनी सांगितले.

      कळस चे सरपंच राजेंद्र गवांदे यांनी रमाई यांच्या जीवन पट सांगितला. वसतिगृहातील मुलांना भोजन नसल्याने मूल उपाशी राहिलेले पाहू शकत नाही म्हणून स्वतःची दागिने गहाण ठेवणारी ही माता होती.     यावेळी कवी अशोक शिंदे यांनी माता रमाई यांच्या जीवनावर कविता सादर केल्या. कु. राजेश्वरी एखंडे, अनुप जगताप यांनी माता रमाई च्या जीवनावर भाषण केले.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्तविक शिक्षिका श्रीमती वेदांती नाईकवाडी यांनी तर आभार यास्मिन तांबोळी यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post