"गोकुळ प्रताप आंबरे" याची केंद्र सरकारच्या नाबार्ड बॅकेच्या ग्रेड ' अ ' प्रथम वर्ग सहायक मॅनेजर पदावर निवड




"गोकुळ प्रताप आंबरे" याची केंद्र सरकारच्या  नाबार्ड बॅकेच्या ग्रेड ' अ ' प्रथम वर्ग  सहायक मॅनेजर पदावर निवड



 अकोले -  अकोले तालुक्यातील गणोरे येथील सेवा सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रताप आंबरे व सौ. प्रभावती प्रतापआंबरे यांचे चिरंजीव "गोकुळ प्रताप आंबरे" याची केंद्र सरकारच्या  नाबार्ड बॅकेच्या ग्रेड ' अ ' प्रथम वर्ग  सहायक मॅनेजर पदावर निवड झाली. 

     केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयातर्गत येणाऱ्या  कृषी व ग्रामीण विकासा मध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या नाबार्ड अंतर्गत ९७ पदासाठी  देश पातळीवर ग्रेड 'अ' असिस्टंट मॅनेजर या पदासाठी परीक्षा घेण्यात आली होती.  १ सप्टेंबर २०२४ रोजी जवळपास १लाख विद्यार्थ्यांनी पुर्व परीक्षा दिली होती. यामधून २४०० पात्र विद्यार्थ्यांनी २४ ऑक्टोबर २०२४ रोजी झालेल्या  परीक्षेतून २९७   विद्यार्थी मुलाखतीसाठी पात्र झाले. या पात्र विद्यार्थ्यांची २९ जानेवारी ते १३ फेब्रुवारी दरम्यान  मुलाखती पार पडल्या. अंतिम निकाल २४ फेब्रुवारी रोजी जाहीर होउन गोकुळ प्रताप आंबरे  याची परीक्षेत ९७ विद्यार्थ्यांत देश पातळीवर   निवड झाली. 

        गोकुळ चे   इयत्ता १० वी पर्यंत माध्यमिक शिक्षण गणोरे येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात तर  त्यापुढील ११ वी १२ वी चे शिक्षण संगमनेर येथील सह्याद्री महाविद्यालयात झाले,  लोणावळा येथील न सिंहगड महाविद्यालया संगणक अभियांत्रिकी ची पदवी घेतली. त्यानंतर यूपीएससी च्या दोन मुख्य परीक्षा दिल्या,आणि अनेक राज्यसेवा गट ब च्या मुख्य परीक्षा दिल्या. भारतीय डाक विभागात नोकरी करत कार्यालयीन वेळेनंतर आणि रविवार  अभ्यासात कायम सातत्य ठेवत अखेर गोकुळ ने जिद्दीने यश मिळवले. यशा बद्दल त्याचे गणोरे पंचक्रोशीत अभिनंदन होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post