इन्स्पायर अवॉर्ड साठी यशराज ठाकूरची निवड
अकोले :- येथील अगस्ती विद्यालयातील यशराज ठोकळची इन्स्पायर अवॉर्डसाठी निवड झालेली आहे. त्यांने color detector in advance feature हा प्रोजेक्ट तयार केला आहे.
. इयत्ता नववीत शिकत असलेल्या यशराज ने बनवलेल्या प्रोजेक्टचा उपयोग cloth फॅक्टरी, chemical फॅक्टरी, मेडिसिन अँड फूड फॅक्टरी मध्ये उपयोगी येणार आहे. या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रकल्पाला शासनाकडून दहा हजार रुपये बक्षीस मिळणार आहे. सदर प्रकल्प तयार करण्यासाठी यशराजला विद्यालयातील गणित विज्ञान विषय शिकवणारे शिक्षक अनिल दाते सर यांच्यासह विद्यालयातील विज्ञान आणि गणित विषय शिकवणाऱ्या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल श्री अगस्ती एज्युकेशन सोसायटीच्या सेक्रेटरी सौ शैलजा पोखरकर मॅडम, कार्यवाहक श्री शिरीष नाईकवाडी,सतीश नाईकवाडी, संदीप नाईकवाडी, मुख्याध्यापक शिवाजी धुमाळ, पर्यवेक्षक मंगेश खांबेकर,संजय शिंदे शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष गिरीश नवले यांच्या सर्व शिक्षकांनी या गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले
