२३ विद्यार्थ्याना प्रत्येकी १० हजारांची शैक्षणिक मदत
राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर कंपनी मुंबईच्या वतीने अनुसूचित जाती व जमातीतील होतकरू विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या मदतीतून अकोल्यातील २३ विद्यार्थ्याना साऊ एकल महिला समितीच्या मार्फत प्रत्येकी १० हजारांची मदत वितरित करण्यात आली.
अहमदनगर येथील सिएसआरडी संस्थेच्या वतीने या प्रकल्पाचे संचलन केले जाते. या मदतीचे हे २ रे वर्ष आहे. आज साऊ एकल महिला समितीच्या कार्यालयात या २३ विद्यार्थ्याना चेक प्रदान करण्यात आले. यावेळी मॉडर्न हायस्कूल च्या प्राचार्य चित्रा कांबळे, पर्यवेक्षक सुधीर जोशी,रोटरी क्लब चे अध्यक्ष विद्याचंद्र सातपुते, पत्रकार श्रीनिवास रेणुकादास,ऍड.वसंत मनकर, खंडूबाबा वाकचौरे,सिएसआरडी चे गौरव धात्रक,सागर वानखेडे, ऋषिकेश बळींद उपस्थित होते.
या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना मिळालेली ही मदत पालकांनी त्यांच्या शिक्षणासाठी खर्च करावी व विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करून संस्थेने दिलेल्या मदतीची जाणीव ठेवावी असे सर्व वक्त्यांनी सांगितले. साऊ एकल महिला समितीच्या अध्यक्ष प्रतिमा कुलकर्णी,सीमा भागवत, गीता आवारी, वर्षा बेळे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

