भैरवनाथ आधार प्रतिष्ठानचे उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी - पद्मश्री राहिबाई पोपेरे



 भैरवनाथ आधार प्रतिष्ठानचे उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी - पद्मश्री राहिबाई पोपेरे

          अकोले प्रतिनिधी भैरवनाथ आधार प्रतिष्ठान चास राबवत असणारे शिक्षण , आरोग्य, समाजसेवा व दारूबंदी हे उपक्रम गावाला व तालुक्याला दिशा देणारे आहेत,असे उद्गार पद्मश्री बीजमाता राहीबाई पोपरे यांनी भैरवनाथ आधार प्रतिष्ठान आयोजित व जिल्हा परिषद चास, आनंदवाडी ,गणेशवाडी ,सोनकडा चाॅंदसूरज व घोडेवाडी प्रस्तुत "जल्लोष चिमुकल्यांचा, अविष्कार कलागुणांचा" या विविध गुणदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रम प्रसंगी काढले.

यावेळी व्यासपीठावर गटशिक्षणाधिकारी अरविंद कुमावत ,शिक्षण विस्तार अधिकारी गोवर्धन ठुबे, केंद्रप्रमुख वाल्मीक बडे,लेखक व सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब कासार ,डॉ. शिवाजी खेमनर तसेच चास गावच्या सरपंच सुरेखाताई रामदास शेळके, उपसरपंच सचिन मारुती शेळके, माजी सरपंच बाळासाहेब रामभाऊ शेळके ,अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे संचालक कैलासराव शेळके, सोसायटीचे चेअरमन प्रकाश गोडसे ,व्हॉइस चेअरमन राजाराम जाधव ,ग्रामपंचायत सदस्या नंदा खैरे,इंद्रायणी वाकळे,नंदिनी जाधव ,बचत गटाच्या अध्यक्षा रंजना दत्तात्रय शेळके, निशिगंधा संजय गिरी तसेच विविध संस्थांचे  पदाधिकारी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी जिल्हा परिषद शाळा व भैरवनाथ आधार प्रतिष्ठान यांनी अतिशय दर्जेदार व आधुनिक पद्धतीने या बालकलाकारांना मोठे व्यासपीठ निर्माण करून दिले आहे. या सर्व शाळांतील विद्यार्थ्यांनी देखील अतिशय दर्जेदार पद्धतीने आपले कलागुण सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये उपाध्यक्ष संदीप जाधव यांनी प्रतिष्ठानच्या मार्फत राबवले जाणारे  उपक्रमांची माहिती दिली.

कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी भैरवनाथ आधार प्रतिष्ठानचे अध्यक्ष नवनाथ पवार, उपाध्यक्ष संदीप जाधव ,खजिनदार नितीन शेळके, सदस्य प्रवीण शेळके,रामदास शेळके, तानाजी  वाडेकर, किरण शेळके, राजेश दुरगुडे,  अमोल कोकाटे, तुषार शेळके ,विनोद शेळके तसेच जिल्हा परिषदेचे शिक्षक भास्कर तुरनर, भाऊसाहेब ढगे, बाळासाहेब कर्पे, राहुल गायकवाड ,भरत उघडे , भाऊसाहेब कोटकर ,गजरा चौधरी, मनीषा सावंत, सोनाली घुले, जयवंत भांगरे यांनी अथक परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश जाधव ,विजय दुरगुडे,राहुल देशमुख यांनी केले व आभार प्रदर्शन सुनील शेळके यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post