अकोलेत परवानाधारक देशी दारु विक्रेत्यावर दरोडा ...
२ लाख २९ हजाराचा मुद्देमाल व रोख रक्कम नेली चोरून
अकोले प्रतिनिधी -
अकोले शहरातील परवानाधारक देशी दारु विक्रेते काशीबाई म्हतारबा डोंगरे (रा.देवठाण रोड अकोले,वय 76) व त्याचे मुलीस सोफा व खुर्चीला दोरीने बांधून तोंडाला चिकट टेप लावून चाॅपर व पिस्तूल हातात घेऊन जीवे मारण्याची धमकी देत चार इसमानी 2,29,000 /- रुपयांचा मुद्देमालासह व रोख रक्कम दरोडा टाकून चोरून घटना घडली आहे.
याबाबत अकोले पोलिसांत काशीबाई म्हतारबा डोंगरे ( रा.देवठाण रोड,वय 76)यांनी फिर्याद दिली असुन यात म्हटले आहे कि दि 18/04/2025 रोजी पहाटे 05/15वा. पासून ते सकाळी 11/30 वाजेच्या दरम्यान डोंगरे निवास देवठाण रोड मॉडर्न शाळेजवळ अकोले येथील घरात फिर्यादी असताना आरोपी, ओमकार शेटे (पूर्ण नाव माहित नाही) ,निखिल चौधरी (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही),प्रभाकर भिमाजी वाकचौरे (राहणार नवलेवाडी तालुका अकोले) व बाहेरी एक अज्ञात इसम यांनी फिर्यादी यांच्या घरी येऊन फिर्यादी व फिर्यादी यांची मुलगी राणी हिस पांढऱ्या रंगाच्या सुती दोरीने सोफा व खुर्चीला बांधून ठेवून तिच्या तोंडाला चिकट टेप लावून आधी मधी चिकट टेप काढून फिर्यादी कडून व फिर्यादीच्या मुलीकडून घरातील वस्तूची माहिती घेऊन माहिती न दिल्यास मारहाण करून चाॅपर व पिस्तूल हातात घेऊन जीवे मारण्याची धमकी देऊन फिर्यादीच्या घरातील कागदपत्रे, बँकेचे सह्या असलेले कोरे चेक, बँकेच्या लॉकरची चावी, सोन्याचे दागिने मोबाईल व ऍक्टिवा स्कुटी नंबर MH 17 -CU-3363 (अंदाजे 15,000/ रुपये किमतीची )आणि रोख रक्कम असा एकूण अंदाजे 2, 29 ,000/- रुपयांचा मुद्देमाल व रोख रक्कम बळजबरीने आरोपी त्यांनी चोरून नेले असल्याचे फिर्यादीवरुन अकोले पो.स्टेला गुरन -195/2025.भारतीय न्याय संहिता चे कलम-309(6),333,351(2) ,(3),115(2) व आर्म ॲक्ट -3/25,4/25प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पो.नी.महेद्र बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी खांडबहाले हे करत असुन आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहे तर उपविभागीय पोलिस अधिकारी कुणाल सोनवणे व पोलिस निरिक्षक महेद्र बोरसे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.