निधन वार्ता- विमल गोविंदराव नेहे
अकोले प्रतिनिधी- तालुक्यातील सावरगाव पाट येथील मूळ रहिवासी विमल गोविंदराव नेहे ( वय वर्षे ७७) हल्ली राहणार अकोले यांचे बुधवारी निधन झाले. अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे अकोले तालुकाध्यक्ष शिवाजी गोविंदराव नेहे यांच्या त्या मातोश्री होत.
त्यांच्या पश्चात मुलगा शिवाजी गोविंदराव नेहे,तीन मुली डॉ.मनीषा भालसिंग, संगीता नवले व वृंदा जाधव,सून एड. सरोजीनी नेहे जावई, नातवंड पतवंड असा परिवार आहे.
त्यांच्या निधनाने अकोले तालुक्यात शोककळा पसरली.त्यांच्यावर अकोले येथील अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सर्व क्षेत्रातील मान्यवर, नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.