सहयाद्रीतील भंडारदरा कळसूबाईच्या कुशीत रमला नांदगाव डी .एड. कॉलेजच्या मित्रांचा स्नेहमेळा
अकोले प्रतिनिधी-
ता . नांदगाव जि. नाशिक येथील अध्यापक विदयालयाच्या २००४ ते २००६ च्या बॅचचे विदयार्थी जवळपास १८ वर्षांनंतर गेट टूगेदरच्या निमित्ताने एकत्र भेटले . अकोले तालुक्यातील भंडारदरा -कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी असलेल्या वाकी गावातील कृष्णावंती बेस कॅम्प बांगर वस्ती येथे हा दोन दिवशीय स्नेहमेळा उत्साहात पार पडला . या स्नेहमेळाव्यासाठी प्रमूख पाहुणे रानकवी तुकाराम धांडे व मेजर विठ्ठल बांगर उपस्थित होते . मेजर विठ्ठल बांगर यांनी सर्व डी .एड मित्र परिवारांचे स्वागत -सत्कार केला . रानकवी तुकाराम धांडे यांच्या वास्तववादी निसर्ग व ग्रामीण जीवनाच्या परिचय देणाऱ्या कवितांनी सर्वांना मंत्रमुग्ध केले . रानवेडी, बाप , माता आणि माती या कवितांच्या सादरीकरणातून कविवर्यांच्या ज्ञान व विचारांचे , समृद्ध अनुभवाचे दर्शन घडले .
" दु : ख आडवायला उंबऱ्यामधला , मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा " . या सुप्रसिद्ध गीताची आठवण या प्रसंगी सर्वांना झाली .डी.एड. चे दोन वर्ष संपल्यावर शिक्षणासाठी एकत्र आलेली पाखरं आपापल्या घरट्याकडे कॉलेज जीवनाच्याच्या आठवणींसह परतली व आपापल्या कुटूंबात रमली , नोकरीच्या शोधात ते दोन वर्ष काहीशी विसरली . दरम्यानच्या काळात बरेचशे मित्र शासकीय नोकरीत रूजू झाले आणि पुन्हा एकदा डोळ्यांसमोर कॉलेजचे ते दिवस उभे राहू लागले .ओढ लागली ती सर्वांनी एकत्र भेटण्याची आणि तो आनंदाचा क्षण एप्रिल २०२५ मध्ये आला .स्नेहमेळ्याच्या निमित्त पुन्हा एकदा जवळ पास १८ वर्षांनी एकत्र भेटलेले मित्र एकमेकांची गळाभेट घेत ख्याली खुशाली विचारू लागले . त्या भेटीत " कृष्ण -सुदामा " मित्रप्रेमाची आठवण दिसली .सर्वांनी खूप आनंद घेत नृत्य, गाणी , गप्पा -गोष्टींचा मनमुराद आनंद लुटला . पुन्हा एकदा या पहिल्याच गेट टूगेदरच्या अविस्मरणीय आठवणी घेऊन समाधानाने आपापल्या कार्यक्षेत्रात पोहचली ,एकमेकांना सुख - दुःखात सदैव साथ देण्याचा शब्द देऊन आणि पुन्हा पुन्हा भेटण्याचे वचन घेऊन .
या स्नेहमेळ्यासाठी विलास लाडे -प्राथमिक शिक्षक ( धुळे ) , संजय कोल्हे- प्राथमिक शिक्षक ( नाशिक ) , दिगंबर टोणपे -माध्यमिक शिक्षक ( जळगाव ), स्वप्निल कडू ( अहिल्यानगर ) , आदिनाथ केंद्रे -लिपीक आरटीओ ( नांदेड ) , प्रदिप पाटील - प्राथमिक शिक्षक ( जळगाव ) , सतिष घुगे -प्राथमिक शिक्षक ( अहिल्यानगर ) , शंकर खैरनार - प्राथमिक शिक्षक ( नाशिक ) , भगवान कदम - प्राथमिक शिक्षक ( छत्रपती संभाजीनगर ) , धनाजी सूर्यवंशी -प्राथमिक शिक्षक ( लातूर ) , किरण अहिरे -प्राथमिक शिक्षक ( धुळे ) , बाबा गायकवाड -मंडळ अधिकारी ( परभणी ) , शरद गांगोडे -माध्यमिक शिक्षक ( नाशिक ) , किरण नागरे -प्राथमिक शिक्षक ( अहिल्यानगर ) , दत्तात्रय घायाळ - प्राथमिक शिक्षक ( जालना ) , दादासाहेब साबळे -प्राथमिक शिक्षक (धाराशिव ) , गजानन पारे -माध्यमिक शिक्षक ( परभणी ) , राकेश गांगुर्डे -प्राथमिक शिक्षक (अहिल्यानगर ) , मंगेश पांडे -प्राथमिक शिक्षक ( बुलडाणा ) , उदय भामरे -राज्यकर अधिकारी ( नाशिक ) , अमोल क्षिरसागर - प्राथमिक शिक्षक ( नांदेड ) , विशाल क्षिरसागर -महाराष्ट्र पोलीस ( बीड ) ,कृष्णाराजे सुरे ( बीड ) , वैद्यनाथ भुसारे - उपशिक्षक (परभणी ) , निलेश गायकवाड - एपीआय ( नाशिक ) ,प्रवीण दातरे -एपीआय ( नाशिक ) , सुदर्शन चापके ( परभणी ) , सूर्यकांत टेकाळे ( जळगाव ) , राहूल सोनवणे -प्राथमिक शिक्षक ( अहिल्यानगर ) , उषा घाणे -प्राथमिक शिक्षक ( नाशिक ) , प्राची वैदय ( नांदेड ) , वैजयंती वैदय - प्राथमिक शिक्षक ( अहिल्यानगर ) , प्रदिप जाधव (जळगाव )इत्यादी मित्र परिवार सहभागी झाला होता . या संपूर्ण स्नेहमेळाव्याचे नियोजन अर्जुन तळपाडे -प्राथमिक शिक्षक ( अकोले ) यांनी पाहिले .पहिल्याच गेट टूगेदर चा हा सोहळा परमोच्च आनंद देणारा ठरला .
