आदिवासी ठाकर समाजातील युवा नेते मारूती मेंगाळ करणार शिवसेनेत प्रवेश
अकोले प्रतिनिधी --- अकोले तालुक्यातील आदिवासी ठाकर समाजातील युवा नेते मारूती मेंगाळ यांचे समवेत भाजपा,राष्ट्रवादी, कॅाग्रेस सह इतर पक्षातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत असल्याने तालुक्यात राष्ट्रवादी ,भाजपाला खिंडार. पाडत शिवसेना भक्कम होणार असल्याची चर्चा आहे.
अकोले तालुक्यातील आदिवासी ठाकर समाजाचे युवा नेतृत्व व विधानसभा निवडणूक २०२४ अपक्ष उमेदवार म्हणून लढलेले पंचायत समितीचे माजी उपसभापती मारुती मेंगाळ यांनी नुकतीच राज्याचे उपमुख्यमंञी व शिवसेना प्रमुख ना.एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन येत्या काही दिवसांत विविध पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते समवेत ना.एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले आहे.यावेळी मेंगाळ यांनी तालुक्यातील ६० ग्रामपंचायतीचे सरपंच,काही पंचायत समिती सदस्य,तसेच भारतीय जनता पार्टी,राष्ट्रवादी कॅाग्रेस पार्टी, व तालुक्यातील काही सहकारी संस्थाचे संचालक यांची यादीच ना.एकनाथ शिंदे यांना दिलेली आहे.येत्या २६ एप्रिल २०२५ रोजी ठाणे येथे हा भव्य पक्ष प्रवेश सोहळा असल्याची खात्री लायक माहिती आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात शिवसेनेत हा प्रवेश सोहळा झाल्यास तालुक्यातील मोठा राजकीय भूकंप ठरणार आहे .
जिल्हा परिषद--पंचायत समितीच्या निवडणूका येत्या काळात होण्याची शक्यता असताना भाजप,राष्ट्रवादी,सह इतर पक्षाना खिंडार पाडत शिवसेना पक्षात होणारे पक्ष प्रवेश तालुक्यात शिवसेना पक्षाची ताकद वाढवणार आहे.जिल्हा परिषद अध्यक्षपद हे अनुसूचीत जमाती साठी राखीव असुन या जागेसाठी अकोले तालुक्यातुनच उमेदवार निवडला जाणार असुन त्यासाठी शिवसेना पक्षाची वाढलेली ताकद कामी येणार आहे .जिल्हा परिषद अध्यक्ष शिवसेनेचा होण्याची शक्यता आहे
मारुती मेंगाळ हे तालुक्यातील आदिवासी भागातील ठाकर समाजाचे नेतृत्व असले तरी त्यांची बहुजन समाजावरही छाप असल्याने बहुजन समाज त्याचेपाठीमागे कायम उभा राहत असतो.त्यांनी गेल्या काही वर्षात आपल्या कार्याने वेगळी छाप पाडली असुन ते अकोले पंचायत समितीचे उपसभापती असताना उल्लेखनीय काम केले असल्याने उपसभापती नावानेच त्याची ओळख झाली आहे.विधानसभा २०२४ च्या निवडणूकीच्या वेळी त्यांची महाविकास आघाडिच्या राष्ट्रवादीचे शरद पवार गटाकडुन मुलाखत घेतली होती शेवटपर्यंत ते उमेदवारीसाठी स्पर्धेत होते तर त्यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी लढवली होती. आता ते राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंञी ना.एकनाथ शिंदे यांच्या कार्याने प्रभावित होऊन त्यांचे नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यांनी नुकतीच ना.एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे भेट घेतली असुन याबाबत त्यांनी पत्रकाराना माहिती देताना सांगितले आहे कि तालुक्यातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेक मातब्बर नेते,पदाधिकारी कार्यकर्ते तसेच तालुक्यातील ६० ग्रामपंचायतीचे सरपंच, काही पंचायत समितीचे सदस्य हे आपले सोबत येत्या शनिवारी ठाणे येथील आशर आय टी पार्क रोड नं १६ वागळे इस्टेट ठाणे येथे आपले नेते राज्याचे उपमुख्यमंञी ना.एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित भव्य पक्ष प्रवेश सोहळा होणार आहे.या पक्ष सोहळ्यानंतर तालुक्यात शिवसेनेची ताकद निश्चित वाढणार आहे .तालुक्यात शिवसेनेचा विचार पहिल्यापासून रुजलेला आहे तो आता पुन्हा उभारी घेईल व येत्या काळात अकोले तालुक्यातील विविध संस्था व ठिकाणावर शिवसेनेचा झेंडा फडकणार यात शंका नाही असा विश्वास व्यक्त केला
