वसुंधरा ॲकेडमीत लाभार्थी विद्यार्थी व पालकांना सरकारी दाखल्यांचे वितरण
अकोले, (प्रतिनिधी) : शिक्षण विभाग पंचायत समिती अकोले, सुप्रीम कोर्ट से न्यायाधीश यांच्या लाभार्थी माहिती सादर करणे संदर्भातला आदेश व तहसील कार्यालयाकडील सूचना यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेली शासकीय प्रमाणपतत्रे शाळेतच उपलब्ध करून देण्यात आली. बऱ्याच वेळी विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आवश्यक असलेली विविध शासकीय प्रमाणपत्रे, दाखले मिळण्यासाठी शासकीय कार्यालयात फेऱ्या माराव्या लागतात.
काही वेळेला विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे वेळेवर उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे पालक त्रस्त होतात. पालकांचा हा त्रास कमी करण्यासाठी अकोले येथील पंचायत समिती व तहसील कार्यालय यांच्या सूचनेनुसार ज्या विद्यार्थ्यांना उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, जातीचा दाखला अशा प्रकारची शासकीय प्रमाणपत्रे हवी होती त्या विद्यार्थ्यांची माहिती सेतू कार्यालयाकडे सादर आली व अगदी अल्पकालावधीत या विद्यार्थ्यांना आवश्यक असलेले दाखले उपलब्ध झाले. सदर लाभार्थी पालक व विद्यार्थ्यांना वसुंधरा अकॅडमीच्या प्राचार्य डॉ. जयश्री देशमुख यांच्या हस्ते उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, डोमासाईल सर्टिफिकेट, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट या प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. त्यामुळे पालक वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
