निधन वार्ता - सुखदेव रखमाजी शेटे सर
अकोले प्रतिनिधी- अकोले येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सेवा निवृत्त कार्यालयीन अधीक्षक सुखदेव रखमाजी शेटे सर( वय ६३ वर्षे) यांचे दीर्घकालीन आजाराने दि.७ एप्रिल रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा,मुलगी,सून,जावई, दोन भाऊ,दोन बहिणी,नातवंडे असा मोठा परिवार आहे.
हभप शांताराम महाराज पापळ यांचे ते मेव्हणे होत. त्यांच्या मूळगावी पिंपळगाव खांड येथे स्मशानभूमी मध्ये शोकाकुल वातावरणात अंत्य संस्कार करण्यात आले. यावेळी तालुक्यातील सर्वच क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
