अगस्ति विद्यालयाचा शिष्यवृत्ती परीक्षा निकाल कौतुकास्पद



 अगस्ति विद्यालयाचा शिष्यवृत्ती परीक्षा निकाल कौतुकास्पद 

अकोले प्रतिनिधी -- 

    येथील श्री अगस्ति एज्युकेशन सोसायटीचे अगस्ति माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अकोले विद्यालयाचा पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5 वी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8 वी  2025 चा निकाल कौतुकास्पद लागला असून निकालाची अखंड परंपरा कायम राखत विद्यालयाने    गौरवास्पद कामगिरी केली आहे. संस्थेचे संस्थापक सेक्रेटरी गुरुवर्य बा. ह .नाईकवाडी तथा बाबा यांनी सातत्याने बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणातून ज्ञानाचे धडे देत सुसंस्कारित करण्याबरोबर गुणवत्तेला प्राधान्य देत लोकशिक्षण दिले.सामाजिक, सांस्कृतिक वारसा पुढील पिढीला प्रेरक ठरावा यासाठी संस्थेच्या सर्वच विद्यालयातील विद्यार्थ्यांना विविध उपक्रमातून संस्कारित केले.

तर बाबांच्या पश्चात कै दुर्गाबाई नाईकवाडी तथा आई यांनी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत संस्थेची धुरा सांभाळली आणि प्रत्यक्ष विद्यालयाना भेटी देत गुणवत्ता वाढविण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यासाठी मार्गदर्शन केले .आजही संस्था व्यवस्थापन तोच समृद्ध वारसा पुढे नेत संस्थेच्या सर्वच विद्यालयात सहशालेय उपक्रमाबरोबर शिष्यवृत्ती परीक्षा , एन. एम. एम. एस.परीक्षा, नवोदय , 10 वी बोर्ड ,12 वी बोर्ड परीक्षा आदी परीक्षांचे उत्तम नियोजन, सराव , तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन ,वैयक्तिक मार्गदर्शन देण्यासाठी संस्था व्यवस्थापन नेहेमीच तत्पर असते .अगस्ति विद्यालयाने यावेळी प्राथमिक स्तर इयत्ता 5 वी पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत तालुक्यात गुणवत्ता राखत 13 विद्यार्थी तर पूर्व माध्यमिक स्तर इयत्ता 8 वी  शिष्यवृत्ती परीक्षा 21 विद्यार्थी पात्र ठरले . 

प्राथमिक विभागातून प्रियदर्शनी भवार,आदिती शिंदे,नूतन दराडे,साईश्री ढोकरे,प्रज्वल वैराळ ,सर्वेश शेणकर , आशिष गोडे,प्रज्वल आरोटे,प्रांजली रोंगटे ,कार्तिकी नवले,अजिंक्य वैद्य ,तेजस माने, आराध्या लहामटे व माध्यमिक विभागातून अर्णव सोनवणे ,पलक आवारी,दीक्षा मंडलिक,आयुष आवारी,प्रणिता दराडे,अनुष्का आवारी,स्वरा धुमाळ, आर्या वैराळ,सायली गवांदे,प्रणित पाचपुते, सर्वेश नाईकवाडी, श्रेया डगळे,कार्तिक ढगे,मित भोयर,प्रणित आवारी,आरुषी नवले,आर्य गुजर,अस्मिता सुपे, अनुष्का आवारी,पियुष दिघे,प्रज्वल एरंडे या विद्यार्थ्यांनी यश मिळवले.त्यांच्या या यशाबद्दल संस्थेच्या सेक्रेटरी शैलजा पोखरकर, कार्याध्यक्ष शिरीष नाईकवाडी , सतीश नाईकवाडी , संदीप नाईकवाडी , मुख्याध्यापक शिवाजी धुमाळ , उपमुख्याध्यापक प्रकाश सोनवणे, पर्यवेक्षक मंगेश खांबेकर, संजय शिंदे व मार्गदर्शक शिक्षक अनिल दाते,विजय उगले,सुनिता नाईकवाडी,विठ्ठल पटेकर,प्रशांत वाकचौरे, कविता शेटे,अनिता पापळ,स्मिता देशमुख, ,प्रमिला आरोटे,अंकिता दराडे , सुरज गायकवाड,घनश्याम माने,राहुल जाधव ,प्रकाश आरोटे आदींसह पालकवर्गाकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .

Post a Comment

Previous Post Next Post