गटशिक्षणाधिकारी यांच्या हस्ते गर्दणी शाळेत गुणवंतांचा सत्कार



 गटशिक्षणाधिकारी यांच्या हस्ते गर्दणी शाळेत गुणवंतांचा सत्कार

   

   जिल्हा परिषद अहिल्यानगरचे सीईओ आशिष येरेकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात मिशन आरंभ हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमात इयत्ता ५ वी व ८ वी च्या धरतीवर इयत्ता ४ थी व ७वी ची स्कॉलरशीप परिक्षा घेतली जाते. गेल्या महिन्यात ही परिक्षा नुकतीच झाली व त्याचा निकाल मागिल आठवड्यात लागला. 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गर्दणी येथील ४थी चा निकाल ९५% लागला. तर सातवीचा निकाल ६७ % लागला. तसेच जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत इयत्ता ७वीच्या कु . पायल मडके व कु वृंदा मंडलिक चमकल्या. इयत्ता ४थी चे २०० गुणाच्या वर ४ मुले आली. तसेच जिल्हा परिषद प्राथ.शाळा ढोकरी येथील ४ थी चे 3 मुले गुणवत्ता यादीत आली. तसेच या वर्गांना शिकवणारे शिक्षक तुकाराम आवारी , विनायक कदम व ढोकरी शाळेच्या वर्गशिक्षिका उषा धुमाळ यांचा सत्कार तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी अरविंद कुमावत , देवठाण बीटचे विस्ताराधिकारी अनिल गायकवाड व मुख्याध्यापक सोमनाथ घोरपडे यांच्या हस्ते गर्दणी शाळेत विशेष सत्कार करण्यात आला. 

        तसेच जिल्हा परिषदेकडून गर्दणी शाळेला २० टॅब मिळाले. या टॅबचे उद्घाटनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. गर्दणी शाळेत नुकतीच क्रिकेट लीग पार पडली. त्यात इयत्ता ७वी च्या मुलांनी व मुलींनी चषक पटकावला. त्या खेळाडूंचा सत्कारही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post