वसुंधरा अकॅडेमीच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश, 24 विद्यार्थी पात्र



 वसुंधरा अकॅडेमीच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश, 24 विद्यार्थी पात्र


 अकोले (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेल्या इ. पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. 

या परीक्षेत अभिनव शिक्षण संस्था  संचलित वसुंधरा अकॅडेमीचे विद्यार्थी उत्तुंग यश संपादन करत शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. यानिमित्ताने सर्व पात्र विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा कौतुक व सन्मान सोहळा शाळेमध्ये आयोजित करण्यात आला. अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मधुकरराव नवले , प्राचार्या डॉ. जयश्री देशमुख व प्राचार्या राधिका नवले यांच्या शुभहस्ते सर्व विद्यार्थी ,पालक व मार्गदर्शक शिक्षक यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी अध्यक्ष  मधुकरराव नवले यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे कौतुक केले व या त्यांच्या यशाचा सार्थ अभिमान आहे , विद्यार्थ्यांचे आजचे यश हेच त्यांच्या भविष्यातील वाटचालीची नांदी आहे हे सर्व पालकांनी लक्षात घ्यावे. असे प्रतिपादन केले. तसेच प्राचार्या डॉ. जयश्री देशमुख यांनीही विद्यार्थी व त्यांना नेहमी पाठबळ देणाऱ्या पालकांचे विशेष कौतुक केले व हे आनंदाचे क्षण विद्यार्थी शिक्षक व पालक यांनी एकत्रितपणे साजरे करावे जेणेकरून विद्यार्थ्यांना अधिक प्रोत्साहन मिळून ती यशाची उत्तुंग शिखरे सर करतील व जीवन समृद्ध करू शकतील अशी भावना व्यक्त केली. 

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत वसुंधरा अकॅडेमीच्या शिवरत्न भूषण साठे (२४० गुण), निशांत सुदाम सोनवणे (१७२ गुण), आरोही गिरीश नवले(१७० गुण), शौर्य दीपक कचरे(१६८ गुण), गायत्री विशाल देशमुख (१६०गुण), आराध्या सचिन गायकवाड (१५८ गुण), हर्षवर्धन अनिल चासकर (१५०गुण), व्यास देवानंद आरोटे (१४८ गुण), तेजस प्रभाकर येलमामे(१४४ गुण), स्वरा सचिन नाईकवाडी (१४०गुण), ध्रुवराज देवदत्त शेटे (१४०गुण), विराज जगन्नाथ जाधव (१३८गुण), ईश्वरी शरद सातपुते (१३६ गुण), अनंत गोरखनाथ खेडकर (१३० गुण) हे  विद्यार्थी तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत शुभम अजिनाथ कदम (२२० गुण), ओम सुरींदर वावळे (१७६गुण), आर्यन जनार्दन आभाळे (१५४ गुण) , अनन्या विकास वणवे (१४६गुण), भक्ती विकास साळवे (१३८ गुण), शिवराज धनेश देशमुख (१३८गुण), ईशा विजय गलांडे (१३६गुण), श्रद्धा चंद्रभान लांडगे (१३४ गुण), सार्थक एकनाथ तळपे (१२८गुण) व तनिष्का संतोष गायकवाड (११८गुण)  असे एकूण 24 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत.

या सर्व विद्यार्थ्यांना  सुमैय्या शेख,  अरुणा बगनर, मेघा भालेराव, उज्ज्वला मुसळे, प्राजक्ता सोलपुरे, शोभा नवले, विजय जाधव,  कल्पना मंडलिक,  अजय हांडे, स्नेहा पेंडभाजे या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनव शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मधुकरराव नवले , कोषाध्यक्ष तथा कॅम्पस डायरेक्टर प्राचार्या डॉ.जयश्री देशमुख, सचिव मा. विक्रम नवले , सहसचिव प्राचार्या अल्फोंसा डी. प्राचार्या राधिका नवले यांनी अभिनंदन केले.  कार्यक्रमासाठी सर्व पालक विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.  मान्यवरांचे स्वागत वृषाली शेटे व प्रास्ताविक सुमैय्या शेख यांनी केले तर सूत्रसंचालन प्राजक्ता नेटके व मेघा भालेराव यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post