ब्राह्मणवाडा ( अकोले )
देशासाठी लढलास आणि
या मातीचे ईमान राखले
रक्त सांडले भूमीवर तुझे
स्वतःला तू वाहून टाकले.
देशापेक्षा कुणीही मोठा नाही
ही शपथ मनात घेतली
फेडलेस पांग आई बापाचे
गवसणी आकाशाला घातली...
त्या आईची कुस पवित्र झाली
जिने तुला जन्म दिला
ज्या बापाने तुला सांभाळले
या धरतीसाठी तो धन्य झाला.
भारतमातेच्या रक्षणासाठी
काया तुझी अखंड रे झीजली
रोषन केले नाव आई बापाचे
चितेवर काया फुलांनी सजली.
भारत सरकारने दिली तुला
अखेरची ही मान वंदना
या मातीसाठी प्राण दिला
दरवळेल परी तू चंदना.
शेवटपर्यंत राहील नाव तुझे
जोपर्यंत आहे पृथ्वी चंद्र तारे
पुसणार नाही नाव तुझे कधी
हॄदयात ठेवील जग सारे
हॄदयात ठेवील जग सारे.
अशोककुमार डी शिंदे
ब्राह्मणवाडा ( अकोले )