मातोश्री राधा फार्मसी च्या प्राचार्या डॉ.पल्लवी फलके अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित




मातोश्री राधा फार्मसी च्या प्राचार्या डॉ.पल्लवी फलके अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित 

अकोले ( प्रतिनिधी) अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त  शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत पुण्यशोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने मातोश्री राधा कॉलेज ऑफ फार्मसी वीरगावच्या प्राचार्या डॉ. पल्लवी फलके- कोटकर यांना गौरविण्यात आले आहे. 

पल्लवी फलके या वीरगाव येथील मातोश्री राधा फार्मसी कॉलेज च्या प्राचार्या असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर उंचबिण्याचे व सर्वगुणसंपन्न विद्यार्थी घडविण्याचे काम करत आहेत. ग्रामीण मुलींचे शिक्षण , आरोग्य व सामाजिक स्तर यावर त्यांचाविशेष भर आहे. कोविड काळात सामाजिक बांधिलकी म्हणून तालुकाभर मोफत मास्क व सॅनिटायझर चे वाटप करून करोना जनजागृती केली होती. विद्यार्थ्यांच्या मदतीने विविध उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपत असतात.या पुरस्कारबद्दल संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब वाकचौरे , सचिव अनिल रहाणे , सुप्रिया वाकचौरे , गीता रहाणे, श्री. कोटकर साहेब , सर्व प्राध्यापक व विद्यार्थी वर्गातून  अभिनंदन होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post