अगस्ती महाविद्यालयाचे प्रा सलीम शेख अमेरिकेत संशोधन जर्नल चे रिव्ह्यूअर




अगस्ती महाविद्यालयाचे प्रा सलीम शेख अमेरिकेत संशोधन जर्नल चे रिव्ह्यूअर 


अकोले प्रतिनिधी-
अगस्ती महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागाचे प्राध्यापक *सलिम शेख* यांची *Science Publishing Group, New York, United States of America* च्या *English Language, Literature and Culture* (इंग्रजी भाषा, साहित्य आणि संस्कृती) (ISSN Online: 2575-2413 ISSN Print: 2575-2367) या प्रतिष्ठित संशोधन जर्नलसाठी *रिव्ह्यूअर (Reviewer)* म्हणून निवड झाली. ही निवड Science Publishing Group, New York तर्फे पुढील ३ वर्षांकरिता करण्यात आली आहे. प्राध्यापक सलिम शेख यांचे आत्तापर्यंत १० आंतरराष्ट्रीय ISSN जर्नल्स मध्ये संशोधन लेख प्रकाशित झालेले आहेत. त्यांनी मागील दोन महिन्यांच्या कालावधीत २ आंतरराष्ट्रीय संशोधन परिषदेत (Austria आणि United Kingdom) रिसर्च पेपर प्रेझेंटेशन केलेले आहे. त्यांचे अनेक पुस्तकांवरील परीक्षण (Book Review) तसेच अनेक पुस्तकांमध्ये Book Chapter देखिल प्रकाशित झालेले आहे. ते सध्या संगमनेर महाविद्यालयात, महाराष्ट्रातील नावाजलेले प्राध्यापक, इंग्रजी विषयाचे गाढे अभ्यासक व पुणे विद्यापीठाच्या इंग्रजी अभ्यास मंडळाचे विद्यमान सदस्य, प्रोफेसर डॉ. उमेश शिवराम जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हॉरर साहित्य व फिल्म स्टडीज या विषयावर पीएचडी करत आहेत. 

अगस्ती महाविद्यालयाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकावल्याबद्दल अकोले तालुका एज्युकेशन संस्थेचे कार्यकारी विश्वस्त माजी आमदार वैभवराव पिचड, कायम विश्वस्त गिरजाजी जाधव, स्वीकृत विश्वस्त मधुकरराव सोनवणे, स्वीकृत विश्वस्त सुरेशराव कोते, अध्यक्ष सुनिल दातिर, सेक्रेटरी सुधाकरराव देशमुख,खजिनदार धनंजय संत कार्यकारिणी पदाधिकारी व सदस्य, प्राचार्य डॉ. भास्करराव शेळके, शिक्षणाधिकारी संपतराव मालुंजकर, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे व पुढील प्रवासातील प्रत्येक यशासाठी शुभेच्छा दिल्यात. ‎

Post a Comment

Previous Post Next Post