मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त अकोलेमध्ये भारतीय जनता पार्टी कार्यालय येथे महारक्तदान शिबिरात 100 हुन अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले
अकोले प्रतिनिधी-महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसा निमित्त संपूर्ण राज्यात महाराक्तदान संकल्प शिबीराचे आयोजनाचा भाग म्हणून अकोलेमध्ये भारतीय जनता पार्टी कार्यालय अकोले येथे भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, मा. आमदार वैभवराव पिचड व जिल्हाअध्यक्ष नितीन दिनकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसा निमित्त महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले
या शिबिरात 100 हुन अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी मा. आमदार वैभवराव पिचड, उत्तर अहिल्यानगर जिल्हा महामंत्री सिताराम भांगरे, अकोले मंडळ अध्यक्ष राहुल देशमुख, कोतुळ मंडळ अध्यक्ष बाळासाहेब सावंत, देवठाण मंडळ अध्यक्ष वाल्मिक नवले, राजुर मंडळ अध्यक्ष दत्तू ढगे, बोटा पठार मंडळ अध्यक्ष संतोष शेळके, अ. ता.ए. सोसायटी चे अध्यक्ष सुनील दातीर, सेक्रेटरी सुधाररराव देशमुख, ज्येष्ठ नेते यशवंतराव आभाळे, अकोले नगर पंचायत चे नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, उपनगराध्यक्ष शरद नवले नगरसेवक सागर चौधरी, हितेश कुंभार, विजय पवार, ख.वी संघ संचालक नानासाहेब नाईकवाडी, अ. स. सा. मा. संचालक राजू डावरे, युवा मोर्चा अध्यक्ष प्रतिक वाकचौरे, संतोष तिकांडे, गोकुळ वाघ, किशोर काळे, मुन्ना चासकर, आकाश मालुंजकर, दगडू हासे, संतोष सोडणार, गणोरे सरपंच संतोष आंबरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
या रक्तदान शिबराच्या यशस्वी करण्यासाठी ज्या 100 हुन अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले त्यांचे भाजपा अकोले मंडळ अध्यक्ष राहुल देशमुख यांनी आभार मांडले.