"न्याय आपल्या दारी" या उपक्रमांतर्गत फिरत्या लोकन्यायालयास विशेष महत्व न्या. अनंत रा. टेंगसे
अकोले (ब्राम्हणवाडा) न्याय आपल्या दारी या उपक्रमांतर्गत फिरत्या लोकन्यायालयास विशेष महत्व असून त्यामुळे जलद न्याय होऊन लोकांचा वेळ व पैसा वाचतो. लोकन्यायालयात तडजोडीने वाद मिटलेस उभयपक्षात एकमेकांबद्दल वैरभाव रहात नाही तसेच तडजोडीत हारजीत ही भावना रहात नाही. त्यामुळे मानसीक व शारिरिक स्वास्थ्यही जपले जाते म्हणून लोकन्यायालयात तडजोडीने जास्तीत जास्त प्रकरणे मिटवावीत ,असे प्रतिपादन अकोले न्यायालयाचे सहदिवाणी न्यायधिश श्री.अनंत रा. टेंगसे यांनी ब्राम्हणवाडा येथे स्व. भाऊसाहेब हांडे सभागृहात नुकत्याच आयोजीत केलेल्या फिरत्या लोकन्यायालयाच्या उद्घाटन प्रसंगी केले. सदर लोकन्यायालयास लोकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला.
सदर लोकन्यायालयात पॅनल अध्यक्ष म्हणून न्या. अनंत रा. टेंगसे होते तर पॅनल सदस्य म्हणून अकोले वकील संघाचे जेष्ट सदस्य अॅड. के. बी. हांडे यांनी काम पाहीले. सदर लोकन्यायालयात दिवाणी व फौजदारी प्रकरणे ठेवण्यात आलेली होती.
सदर प्रसंगी वकील संघाचे सचिव अॅड. ज्ञानेश्वर काकड यांनी प्रास्ताविक केले. तर अॅड. के. बी. हांडे यांनी फिरत्या लोकन्यायालयाचे महत्व विषद करुन 'वादाची तड लावणेसाठी दिलेला जोड म्हणजे तडजोड असते' म्हणून लोकन्यायालयात आपापले वाद मिटवून सहभाग नोंदवावा असे अवाहन केले.
सदर लोकन्यायालयात अकोले वकील संघाचे सदस्य अॅड.एन.पी. आरोटे, अॅड.एड.डी.पोखरकर, अॅड. बी. आर. चौधरी यांनी सक्रिय सहभाग नोदविला तर सदर कार्यक्रमास ब्राम्हणवाडा सह. सोसायटीचे चेरअरमन पोपटराव हांडे, उपसरपंच सुभाष गायकर, माजी सरपंच देवराम युवा गायकर, शिवाजी आरोटे, सचिव अशोक हांडे व बहुसंख्य पक्षकार उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अॅड.एस.पी.जाधव यांनी केल, तर आभार अॅड. मंगला के. हांडे यांनी मानले.