अकोले (प्रतिनिधी)
तालुक्यातील वीरगाव येथील धर्मवीर आनंद दिघे इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज आनंदगड येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब वाकचौरे सचिव डॉ अनिल रहाणे संचालिका सौ सुप्रिया वाकचौरे सौ . गीता राहणे प्राचार्य किरण चौधरी रवींद्र आंबरे वसतिगृह अधीक्षक प्रा.भालेराव ,कॅम्पस डायरेक्टर प्रा. संदीप थोरात,शिवराज वाकचौरे , अक्षय रहाणे, सौ.सीमा दिघे सौ.अलका आहेर अंजिरा देशमुख प्रियंका सोनवणे ,दिनेश वाकचौरे,आदी मान्यवर उपस्थित होते
यावेळी मान्यवरांच्या हस्ते धरती आबा भगवान बिरसा मुंडा, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रतिमेला अभिवादन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. कुमारी स्नेहल चौधरी अद्विक तारडे ,श्रेयश वाळे ,खुशी रोडे ऋग्वेद चव्हाण ,काव्या देशमुख ,गौरी गडदे या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत आदिवासी संस्कृती व भगवान बिरसा मुंडा आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे राया ठाकर तंट्या भिल्ल यांचा जीवनपट सांगितला .
प्रसंगी भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,यामध्ये आदिवासी नृत्य ,पोवाडे व गीते सादर करून आदिवासी कलांचे व संस्कृतीचे सादरीकरण केले...
प्रास्ताविक अधीक्षक प्रा.भालेराव यांनी केले सूत्रसंचालन देविदास चारोडे व प्रा.संदीप थोरात यांनी तर आभार लक्ष्मण कवडे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीते साठी
विवेक शेटे ,दत्तात्रय जगताप ,साईनाथ वैद्य ,रवींद्र चिकने ,पंकज वर्पे ,पंकज धुमाळ ,आदित्य नाईकवाडी ,नाफिसा शेख ,माया आंबरे ,स्वप्नाली बाळसराफ सोनाली तनपुरे, शिल्पा जाधव, भारती वाकचौरे, उज्वला दतीर,कविता दातीर अश्विनी गिरी ,स्वाती वाळे ,मोनिका मोरे कोमल भालेराव सह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.