रविवार दि.३१ रोजी अमृतसागर दूध संघाची ४९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा
अकोले प्रतिनिधी-
अमृतसागर सहकारी दूध व्यावसायिक व प्रक्रिया संघ,मर्यादित, अकोले या संस्थेची ४९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उद्या रविवार दि.३१/८/२०२५ रोजी सकाळी ११-०० वाजता अगस्ति कला,वाणिज्य व दादासाहेब रूपवते विज्ञान महाविद्यालय अकोलेच्या के.बी.(दादा) देशमुख सभागृहात आयोजित केलेली आहे.तरी सर्व प्राथमिक दूध संस्थेच्या ठराव प्रतिनिधिंनी सभेस उपस्थित रहावे असे आवाहन
चेअरमन मा.आ.वैभवराव पिचड, व्हा.चेअरमन रावसाहेब वाकचौरे सर्व संचालक मंडळ आणि जनरल मॅनेजर दादाभाऊ सावंत यांनी केले.
