सौ.किर्ती गिर्हे राज्यस्तरीय सह्याद्री रत्न पुरस्काराने सन्मानित
अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील आदिवासी भागात असणाऱ्या उडदावणे गावच्या लोकनिर्वाचित महिला सरपंच सौ किर्ती देविदास गि-हे यांना राज्यस्तरीय सह्याद्री रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे .
अकोले तालुक्यातील आदिवासी भागात असणाऱ्या उडदावणे गावच्या महिला सरपंच सौ . किर्ती देविदास गि-हे यांना पुणे येथे टॅलेंट कट्टा महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने राज्यस्तरीय सह्याद्री रत्न पुरस्कार देऊ नुकतेच गौरविण्यात आले . हा पुरस्कार प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. नीता जोशी , अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा.डॉ . संदीप सांगळे , प्रसिद्ध सिने अभिनेत्री आर्या घारे यांच्या समवेत सौ किर्ती गि-हे यांना पुणे येथील जोशी सभागृहात देण्यात आला .सौ. किर्ती गि-हे यांचे सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान असून त्यांना मिळालेल्या पुरस्कारामुळे भंडारदरा परिसरातून अभिनंदन होत आहे .