अकोले (प्रतिनिधी ):
अकोले तालुक्यातील आंतरभारती रुरल इंटरनॅशनल मेडिकल एज्युकेशन ट्रस्ट संचलित धर्मवीर आनंद दिघे इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज आनंदगड वीरगाव चा इयत्ता बारावी मध्ये शिकणारा विद्यार्थी कुमार धोंगडे विभास गोरकनाथ ह्यास राघोजी भांगरे गुणगौरव योजनेअंतर्गत ३५ हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर झाले. राज्याच्या आदिवासी विकास आयुक्तालयाकडून २०२४-२५ मध्ये इयत्ता बारावी इयत्तेतील विभासने ६९.८३%गुण मिळवून नाशिक विभागात प्रथम क्रमांक मिळवून घवघवीत यशा बद्दल हे बक्षीस जाहीर झाले. कु.विभास च्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब वाकचौरे, संस्थापक सचिव डॉ.अनिल रहाणे, संचालिका सौ सुप्रिया वाकचौरे, सौ. गीता रहाणे, शिवराज वाकचौरे, अक्षय रहाणे, दिनेश वाकचौरे, प्राचार्य किरण चौधरी प्राचार्य डॉ. पल्लवी फलके, अधीक्षक रवींद्र आंबरे, वसतिगृह अधीक्षक प्रा.भालेराव, कॅम्पस डायरेक्टर प्रा. संदीप थोरात, समन्वयक प्रा. विद्याचंद्र सातपुते, अधिक्षिका सौ सीमा दिघे सुपरवायझर अलका आहेर, अंजिरा देशमुख, लक्ष्मण कवडे, प्रियंका सोनवणे, प्रा. कोमल भालेराव, प्रा.रोहिणी चत्तर, प्रा. रवींद्र वर्पे, प्रा. आरोटे मॅडम, प्रा. बाळसराफ मॅडम, प्रा. शेळके मॅडम आदींसह आनंदगड शैक्षणिक संकुलातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच वीरगाव येथील सर्व ग्रामस्थांनी विभास धोंगडे याचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.