भारतीय लोक अतिशय कष्टाळू असून भारताची न्यूझीलंड ला मोठी मदत - न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रीस्तोफर लॉक्सन |
ऑकलंड(न्यूझीलंड) मध्ये भारतीय स्वातंत्र्य दिन सांस्कृतीक कार्यक्रमाने उत्साहात संपन्न
अकोले प्रतिनिधी-
भारतीय लोक अतिशय कष्टाळू असून ते फार चांगले आहेत.मी मुंबई व दिल्लीला तीन महिन्यांपूर्वी जाऊन आलेलो आहे. भारताची न्यूझीलंडला मोठी मदत असून आज भारताची अर्थव्यवस्था ही जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे.असे प्रतिपादन न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रीस्तोफर लॉक्सन यांनी केले.
न्यूझीलंड मधील ऑकलंड येथे ७९ वा भारतीय स्वातंत्र्य दिन विविध सांस्कृतिक कार्यक्रमाने उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रीस्तोफर लॉक्सन उपस्थित होते.यावेळी पंतप्रधानांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन त्यांना अभिवादन केले.
अशी माहिती अकोले स्थित सेवा निवृत्त शिक्षक उत्तम साबळे यांचे यांनी दिली. श्री साबळे यांचे चिरंजीव सौरभ हे ऑकलंड येथे कॉटन सॉफ्ट कंपनी मध्ये मॅनेजर असून ते चिरंजीवाला भेटायला गेलेले असून त्यांना पंतप्रधान यांच्याशी फोटो काढण्याची संधी मिळाली.तसेच पंतप्रधान यांना फक्त एक साध्या वेशात एक बॉडिगार्ड असल्याचे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, न्यूझीलंड मधील ऑकलंड शहरातील महात्मा गांधी सेंटर या ठिकाणी स्वातंत्र्य दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी भारतीय नागरिकांनी व महिला व मुलांनी भारतीय पारंपरिक वेशात देश भक्तीपरप सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून सर्वांचे लक्ष वेधले. कार्यक्रम संपल्यानंतर सर्व उपस्थितितांनी सुरुची भोजनाचा आस्वाद घेतला.