जि.प.प्रा शाळा,उडदावणे येथील उपक्रमशील शिक्षक सोमनाथ लक्ष्मण उघडे यांना राज्यस्तरीय शिक्षक गौरव पुरस्कार 2025 ने सन्मानित

 


जि.प.प्रा शाळा,उडदावणे येथील उपक्रमशील शिक्षक सोमनाथ  लक्ष्मण उघडे यांना राज्यस्तरीय शिक्षक गौरव पुरस्कार 2025 ने सन्मानित

अकोले तालुक्यातील  जि.प.प्रा शाळा,उडदावणे येथील उपक्रमशील शिक्षक सोमनाथ  लक्ष्मण उघडे यांना रायझिंग ट्रायबल फौंडेशन महाराष्ट्र राज्य स्वाभिमान शिक्षक संघटना,अ'नगर या संस्थेच्या  वतीने राज्यस्तरीय शिक्षक गौरव पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आले .

अहिल्यानगर येथील हॉटेल यश ग्रँड  मध्ये आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार प्राथमिक विभागाचे महाराष्ट् राज्याचे सह संचालक रमाकांत काटमोरे यांच्या अध्यक्षतेखाली, माजी शिक्षण संचालक प्राथमिक, पुणे दिनकर टेमकर ,प्रशासन अधिकारी(माध्यमिक)जि.प.अहिल्यानगर जुबेर पठाण यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. यावेळी उडदावणे शाळेचे व्यवस्थापन समिती अध्यक्ष बुवाजी गांगड, अदिवासी सेवक सखाराम गांगड, अदिवासी कवी मिनानाथ उघडे,मुख्याध्यापक शकुंतला आवारी, शिक्षक चंद्रभान मेंगाळ,नामदेव सोंगळ, रघूनाथ उघडे , मंगल मधे ,श्रेया उघडे, सामाजिक कार्यकर्ते कुसा मधे, युवराज सोनवणे, अशोक उघडे तसेच अर्थवेद पतसंस्थेचे संचालक अशोक पथवे व ग्रामस्थ मोठ्या संखेने उपास्थित होते.

श्री सोमनाथ लक्ष्मण उघडे जि.प.प्राथ शाळा उडदावणे ता अकाले, येथे कार्यरत असून त्यांनी समाजात  विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी आवड निर्माण केली,तसेच आदिवासी भागातील मुलांना शिक्षणातील समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले, आदिवासी भागातील व्यसनाधिनता कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.आदिवासी संस्कृती जोपासण्या साठी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन स्पर्धेमधे उडदावणे शाळेत सलग तीन वर्षे जिल्ह्याचा प्रथम क्रमांक मिळविला आहे.

त्यांना हा पुरस्कार  मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post