बेलापूर परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात 22 वर्षीय आदिवासी शेतमजुराचा मृत्यू | नरभक्षक बिबटया जेरबंद करण्याची व पीडित कुटुंबाला आर्थिक मदत करण्याची मागणी


बेलापूर परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात 22 वर्षीय आदिवासी शेतमजुराचा मृत्यू

नरभक्षक बिबटया जेरबंद करण्याची व पीडित कुटुंबाला आर्थिक मदत करण्याची मागणी

अकोले प्रतिनिधी- अकोले तालुक्यातील पठार भागातील बेलापूर परिसरातील पिसेवाडी च्या रस्त्यालगत रस्तावर 22 वर्षीय आदिवासी शेतमजूर असलेल्या तरुणाचा बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ही घटना रविवारी सकाळी 7 वाजता लक्षात आली आहे.
 पप्पू बाळा दुधवडे या तरुणाचे नाव असून तो आपले आई वडील,भाऊ ,भावजयी यांच्या समवेत बेलापूर येथे मजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत आहे.
शनीवारी सकाळी ७ वाजता हे कुटुंब बेलापूर येथे मजुरीला गेले व संध्याकाळी घरी परतत असताना मोटार सायकल मधील पेट्रोल संपल्याने ओळखीच्या घरी मोटर सायकल लावून घरी पायी जात असताना ही घटना घडली असल्याचे निदर्शनास आले.
 रविवारी सकाळी आदिवासी तरुण रवींद्र दुधवडे हा तरुण पायी बेलापूर येथे मजुरीला जात असताना त्याला बेलापूर गावांतर्गत मल्हारवाडी येथील पिसेवस्तीवरील डांबरी रस्त्याच्या कडेला बिबट्याने खालेल्या अवस्थेत मृतदेह निदर्शनास आले.रवींद्र दुधवडे याने पोलीस पाटील केशव त्रिभुवन, भगवान दादा काळे यांना सदर घटनेची माहिती दिली. त्यांनी अकोले पोलीस स्टेशन व वन विभागाचे अधिकारी यांना या घटनेची माहिती दिली. सदर घटनेची माहिती कळताच वन परिक्षेत्र अधिकारी के.सी.पाटील,वन रक्षक दीपक शिंदे,आर एस आंबरे,सुनील शिर्के,नितीन वारे, एस के बढे,बहीरु बेनके,दीपक गवारी, सुनील कुक्कुटवार यांनी पंचनामा केला व नरभक्षक बिबट्या जेरबंद करण्यासाठी ठीक ठीकाणी पिंजरे लावले तर या वेळी पोलीस उप निरीक्षक बी.टी.घोडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल बापूराव देशमुख, जे जे ठेकेदार यांनी सदर घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.व खाजगी रुग्ण वाहिकेतून सदर मृतदेह शव विच्छेदन करण्यासाठी कोतुळ येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आला.
   जुन्नर तालुक्यातील नरभक्षक बिबटे अकोले तालुक्यात वन क्षेत्रात सोडले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.या भागातील बिबट्याने हल्ला केल्याची मनुष्यावर हल्ला केल्याची ही पहिलीच घटना आहे.या घटनेमुळे बेलापूर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.या घटनेमुळे दुधवडे कुटुंबावर हा दुःखाचा डोंगर कोसळला असून पीडित कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी व नरभक्षक बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावावेत अशी मागणी समाजसेवक भगवान काळे, राहुल लांडे,भास्कर भिशे, म्हसवंडी गावचे सरपंच मंगेश बोडके आदिसह ग्रामस्थांनी केली.

Post a Comment

Previous Post Next Post