कृषी परिषदेची अकोले तालुका कार्यकारिणी जाहीर | तालुकाध्यक्ष पदी अजिंक्य मालुंजकर | उपाध्यक्ष पदी सागर चासकर तर सचिव पदी सत्यम धुमाळ
अकोले प्रतिनिधी- पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषद महाराष्ट्र राज्य या शेतकरी हितासाठी काम करणाऱ्या सामाजिक संघटनेची अकोले तालुक्याची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून तालुका अध्यक्ष म्हणून अजिंक्य मालुंजकर यांची निवड करण्यात आली आहे.
पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेची पदाधिकारी बैठक नुकतीच श्रीरामपूर येथील शासकीय विश्रामगृह येथे पार पडली. त्यावेळी या निवडी जाहीर करण्यात आल्या.बैठकीला प्रदेश अध्यक्ष गुणवंत आठरे , प्रदेश उपाध्यक्ष सुरेश तरकसे हे उपस्थित होते.यावेळी अकोले तालुका कार्यकारिणी निवडण्यात आली. अकोले तालुकाध्यक्ष म्हणून अजिंक्य सुरेश मालुंजकर यांची तर तालुका उपाध्यक्ष म्हणून सागर सखाराम चासकर व सुनील बबन गायकवाड यांची तसेच तालुका कार्याध्यक्ष म्हणून अशोक दत्तू गायकवाड,सचिव
पदी सत्यम शंकर धुमाळ,सहसचिव म्हणून नितीन दत्तू बाराते यांची सर्वसंमतीने निवड करण्यात आली.यावेळी कृषी परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते. निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
