नेहे कुटुंबात एकोप्याची भाऊबीज साजरी 45 सदस्यांची उपस्थिती
अकोले (प्रतिनिधी) -
नोकरीधंद्यानिमित्त दुरावलेले नातेवाईक गावाकडे शेतीवर एकत्र यावेत, सर्वांचा परिचय व्हावा, जुन्या नव्या पिढ्यांचा मिलाफ व्हावा, व्यवहार आणि रक्ताचे नाते असलेल्या सर्वांनी एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी व्हावे आणि त्यातून पुढच्या पिढीला चांगला संदेश जावा, या उद्देशाने सावरगाव पाट (ता. अकोले) येथील नेहे कुटुंबाने दिवाळीचे औचित्य साधून अनुसया फार्म हाऊस मध्ये अनोखी भाऊबीज साजरी केली.
आई-वडिलांसह, चार भाऊ, दोन बहिणी यांच्या नात्यातील सर्वांनाच या अनोख्या भाऊबीजेत सहभागी करून घेत सुमारे 45 जणांनी भाऊबीज साजरी करून एकोप्याची ओवाळणी बहिणींच्या ताटात टाकली. गोंदेश्वर रोटरी क्लब सिन्नरचे संस्थापक सतीश नेहे यांच्या संकल्पनेतून त्यांच्या कुटुंबात हा आगळावेगळा सोहळा साजरा करण्यात आला.
भाऊबीजेच्या निमित्ताने नेहे कुटुंबात एकोप्याची भावना वृद्धिंगत झाली 2024 मध्ये एकत्रित भाऊबीजेची प्रथम संकल्पना मानत आली ती साकारली व 70 सदस्यांच्या उपस्थित अविस्मरणीय पद्धतीने पार पडली. 2025 मध्ये भाऊबीजेच्या दुसऱ्या वर्षीही नोकरी व्यवसायानिमित्त विखुरलेले नातलग भाऊबीजेचे औचित्य साधून गावाकडे शेतीवर एकत्र करून कुटुंबातील सर्व सदस्यांना कुटुंबाची एकोप्याची व्याख्या समजली. गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांपासून दुरावलेले नातलग याही वर्षी पुन्हा एकत्र आले. खऱ्याअर्थाने त्यातून एकोप्याची भावना वृद्धिंगत झाली.
सतीश नेहे , संस्थापक गोंदेश्वर रोटरी क्लब, सिन्नर
कुसुम खुळे, पाटीलसाहेब नेहे, बाजीराव नेहे , बाळासाहेब नेहे, सतीश नेहे, चंद्रमोहन निरगुडे , अशोक नेहे , भगवान गोर्डे व भाऊसाहेब काळे या सर्वांच्या परिवारातील मुले, मुली, सुना, भाचे, जावई, नातू असे लहानमोठे जवळपास ९५ सदस्य आहेत. 2024 मध्ये भाऊबीज साजरी केली त्यावेळी 70 सदस्य उपस्थित होते. यावर्षी 45 सदस्य उपस्थित होते. सुट्यां न मिळाल्यामुळे बऱ्याच सदस्यांना इच्छा असूनही उपस्थीत राहता आले नाही. अनोख्या दिवाळीची संकल्पना सतीश नेहे यांनी मांडून ती वास्तवात उतरवली. भाऊबीजेच्या सायंकाळी लहान मोठ्या 45 सदस्यांच्या उपस्थितीत सावरगाव पाट येथे ही भाऊबीज साजरी करण्यात आली. एकमेकांची, मुलांची, सुना, नातवंडांची आपुलकीने सर्वांनी माहिती घेतली विचारपूस केली, सुख दुःखाच्या गप्पा गोष्टी झाल्या. सतिश नेहे यांच्या आई वडिलांचे स्मरण करून प्रतिमाना पुष्पहार चढवत त्यांच्या आठवणींचे स्मरण करण्यात आले. त्यानंतर गणेशाची पूजा, बाप्पाची आरती करून कार्यक्रमास प्रारंभ झाला. 85 वर्षांचे माजी शिक्षणाधिकारी डी. डी. गोर्डे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ठरले. कुसुम खुळे यांनी मनोगत व्यक्त करत ही भाऊबीज संस्मरणीय ठरल्याचे सांगितले.
बाळगोपाळांनी फटाके फोडले. सर्वांनी एकत्रित स्वादिष्ट भोजन केले. त्यानंतर संगीत खुर्ची, समूहनृत्य, गरबा, नृत्य, बालगोपालांची कुस्ती, जेष्ठ सदस्यांनी संगीत खुर्चीचा मनसोक्त आनंद घेतला तर महिलांनी तळ्यात मळ्यात या खेळात आनंद घेतला आणि शेवटी कुटुंबातील मुली डॉ गणेशा मांडे व ऋचा पचपिंड यांनी लावणी सादर करत उत्तरोत्तर कार्यक्रम रंगत गेला. विजेत्यांना विविध प्रकारचे बक्षीस दिले. रात्री 2 वाजेला डॉ गणेशा मांडे यांच्या सुंदर अशा गणेश वंदन नृत्याने कार्यक्रमाची सांगता झाली.भाऊबीज कार्यक्रम सुंदर पणे यशस्वी होण्यासाठी भाऊसाहेब काळे व अशोक नेहे यांनी विशेष परिश्रम घेतले.