अकोले प्रतिनिधी-
अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष युवा नेते अमित अशोकराव भांगरे यांच्या वाढदिवस एकदरा (ता अकोले) येथे साजरा करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली
अकोले तालुक्याचे युवा नेतृत्व आणि स्वर्गीय अशोकराव भांगरे यांचे सुपुत्र अमित भांगरे हे स्वर्गीय अशोकराव भांगरे यांच्या पावलावर पाऊल ठेवून अकोले तालुक्यात काम करत आहे स्वर्गीय अशोकराव भांगरे यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम ते करत आहे.अशा उमद्या नेतृत्वाच्या वाढदिवसाच्या पूर्व संधेला अकोले तालुक्यातील एकदरा येथे दि 5 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी दहा वाजता रोजगार मेळावा आयोजित केला आहे.यावेळी अकोले तालुक्यातील तरुणांनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे
संत निवृत्तीनाथ वारकरी संप्रदाय सेवा ट्रस्ट एकदरे, पिंपळदरावाडी,चंदगीरवाडी जायनावाडी, बिताका तसेच श्री आदिवासी सामाजिक सेवा संस्था मंडळ मोखाजी बाबा,एकदरे यांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याचे माहिती कोकणवाडी चे संतु किसन जाधव,विठ्ठल तुकाराम भांगरे, चिंधु मारुती भांगरे, सुनील तुकाराम भांगरे यांनी दिली