खाकीतला देवमाणूस...पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांनीपुजारी बाबाला फराळ देत घडविले माणुसकीचे दर्शन


खाकीतला देवमाणूस...
पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांनी पुजारी बाबाला फराळ देत घडविले माणुसकीचे दर्शन

अकोले प्रतिनिधी- अकोले तालुक्याचे पोलीस निरीक्षक मोहन बोरसे हे सातारा डोंगर येथे दररोज मॉर्निंग वॉक साठी जात असतात. त्याठिकाणी असलेले पुजारी हे नेहमी एकटेच तिथे राहतात. संपूर्ण अकोले तालुका दिवाळी साजरी करत असताना पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांच्या लक्षात आले की,पुजारी बाबांची दिवाळीला फराळ कोठून आणणार ? हे लक्षात घेऊन श्री बोरसे यांनी दिवाळीच्या दिवशी सातारा डोंगर चढून पुजारी बाबांना फराळ घेऊन गेले. त्यांच्या या कृतीने त्यांनी माणुसकीचे दर्शन घडविले. यावेळी दिवाळी चा फराळ पाहून पुजारी बाबांचा चेहरा खूप काही सांगुन गेला. बाबांनी श्री बोरसे यांचे तोंड भरून कौतुक केले व आज खरी दिवाळी आली असे म्हणताना पुजारी बाबा भावुक झाले होते. व खाकी वर्दीतील देव माणूस मला आज भेटला असे उदगार काढले. हे दृश्य श्री बोरसे यांची सामाजिक भावनेतून दिसुन आलेली तळमळ पाहून त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. कामाच्या व्यापातून हा खाकी वर्दीतील माणूस माणूस किती बारीक विचार करतो.

चौकट- आपण ही समाजाचे काही देणे लागतो हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. खूप लोक असे आहेत की, त्यांची इच्छा असून दिवाळी साजरी करू शकत नाही आणि आपण सगळे काही असून खूप अडचण आहे असे म्हणत दुःखी असतो. ज्याच्या दारीं दिवाळीचा दिवा नाही,घरात फ़राळ नाही अशा लोकांना मदत करा ही खरी दिवाळी. गरीबाच्या दारात दिवा लावा तो आनंद, त्या व्यक्तीचा आशीर्वाद घ्या. असे मत पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांनी व्यक्त केले.

Post a Comment

Previous Post Next Post