डोंगरगाव येथील कै.ग.भा.जिजाबाई कुंडलिक उगले यांचे वृद्धपाकाळाने निधन
डोंगरगाव प्रतिनिधी
डोंगरगाव येथील भाऊसाहेब कुंडलिक उगले यांच्या मातोश्री कै.जिजाबाई कुंडलिक उगले यांचे दि. 19/10/2025 रोजी वयाचा 86 व्या वर्षी वृद्धपाकाळाने निधन झाले.त्यांच्या पश्चात एक मुलगा, चार मुली,सुना,नातू ,पतवंडे,जावई असा मोठा परिवार आहे.
भाऊसाहेब कुंडलिक उगले यांच्या मातोश्री व नेताजी पतसंस्था चेअरमन गणेश(अमोल)भाऊसाहेब उगले,संदीप भाऊसाहेब उगले यांच्या त्या आज्जी होत. डोंगरगाव येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी विविध क्षेत्रातील मोठा जनसमुदाय उपस्थित होता.